इमानचा व्हीलचेअरवरून रुग्णालयात फेरफटका

By admin | Published: April 21, 2017 02:42 AM2017-04-21T02:42:36+5:302017-04-21T02:42:36+5:30

जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता २५० किलोवर आले आहे.

Honest wheelchair visits to hospital | इमानचा व्हीलचेअरवरून रुग्णालयात फेरफटका

इमानचा व्हीलचेअरवरून रुग्णालयात फेरफटका

Next

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदचे वजन आता २५० किलोवर आले आहे. स्लिव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी आणि औषधोपचार या सर्व उपचार पद्धतीनंतर आता इमान हसू-बोलू लागली आहे. त्याचप्रमाणे,
नुकतेच इमानने व्हीलचेअरवरुन रुग्णालयात फेरफटका मारल्याचा व्हीडीओही रुग्णालय प्रशासनाने
यु-ट्युबरील ‘सेव्ह इमान कॉझ’ या वर अपलोड केला आहे.
इजिप्तहून तब्बल २५ वर्षानंतर क्रेनच्या सहाय्याने घरातून बाहेर पडलेली इमान मुंबईत ११ फेब्रुवारी रोजी दाखल झाली. त्यावेळेस, तिचे वजन ५०० किलो होते. आता मात्र इमानच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती सैफी रुग्णालयाचे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इमानचे संगीत ऐकताना, डॉक्टरांशी संवाद साधतानाचे व्हीडीओही अपलोड करण्यात आले आहे. या व्हीडीओज्मध्ये इमानच्या तब्येतीत झालेला बदल हा वैद्यकीय क्षेत्रासाठी आश्चर्यकारक आहे.
इमानचे वजन आता नियंत्रित स्थितीत आहे. त्यामुळे आता लवकरच सीटी स्कॅन करण्यात येणार आहे. जेणेकरुन तिच्या उजव्या बाजूच्या पक्षाघाताचे नेमके कारण कळू शकेल असे डॉ. लकडावाला यांनी सांगितले. तर तिचे फिजिओथेरपीचे सेशन दररोज सुरु आहेत. आता केवळ तिच्या मेंदूच्या अद्ययावत स्थितीचा
वैद्यकीय अहवालाच्या प्रतिक्षेत आहोत.
मागच्या काही दिवसांत इमानला बसता येईल का ? हा प्रश्न सतत मनाला भेडसावत होता आता मात्र ती बराच वेळ व्हीलचेअरमध्ये बूस शकतेय, याचे समाधान असल्याचे इमानच्या वैद्यकीय चमूमधील डॉ. अर्पणा गोविल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Honest wheelchair visits to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.