अण्णाभाऊ साठेंचा भारतरत्न पुरस्काराने गौरव करा; कुटुंबियांचं मागणीसाठी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:37 PM2017-08-16T14:37:10+5:302017-08-16T14:37:59+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलं आहे.
Next
ठळक मुद्दे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलं आहे. अण्णाभाऊंची बहीण, सून, नात, नातजावई, पुतण्या बुधवारी साखळी उपोषणास आझाद मैदानात बसले आहेत.
मुंबई, दि. 16- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे, या मागणीसाठी अण्णाभाऊंची बहीण, सून, नात, नातजावई, पुतण्या बुधवारी साखळी उपोषणास आझाद मैदानात बसले आहेत. शासनाने २०११ साली लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारसी मान्य केल्या होत्या. मात्र त्यांची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. तरी तत्काळ आयोगाची अंमलबजावणी करावी व अण्णाभाऊंचे घाटकोपरच्या चिरागनगरमधील घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी अण्णाभाऊंची सून सावित्रीबाई साठे यांनी केली आहे.