मराठी भाषा दिनी साहित्यिकांचा सन्मान

By admin | Published: February 28, 2017 04:34 AM2017-02-28T04:34:42+5:302017-02-28T04:34:42+5:30

मराठी भाषा गौरव दिनी राज्य शासन आयोजित कार्यक्रमात विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला

Honor of Marathi Language Literature | मराठी भाषा दिनी साहित्यिकांचा सन्मान

मराठी भाषा दिनी साहित्यिकांचा सन्मान

Next


मुंबई : मराठी भाषा गौरव दिनी राज्य शासन आयोजित कार्यक्रमात विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गेट वे आॅफ इंडिया येथे रंगलेल्या या भव्य सोहळ््यात विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारविजेते मारुती चितमपल्ली यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार विजेत्या यास्मिन शेख यांना, कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार विजेते श्याम जोशी यांना, तसेच श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील भारतीय विचार साधना प्रकाशनाला देण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यिक-लेखक उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान विश्वकोश मंडळाच्या वतीने, ‘पेनड्राईव्हमधील विश्वकोशाच’ लोकार्पणही करण्यात आले.
यावेळी मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच विविध साहित्य-प्रकारांसाठीचे स्व. यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरुप असलेले पुरस्कार-डॉ. प्रभा गणोरकर यांना कवी केशवसूत पुरस्कार, रमेश नाईक यांना राम गणेश गडकरी पुरस्कार, बा. भो. शास्त्री यांना हरी नारायण आपटे पुरस्कार, प्रकाश बाळ जोशी यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार, नाट्य लेखक प्रेमानंद गज्वी यांना अनंत काणेकर पुरस्कार, प्रतिमा इंगोले यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार, सुहास बहुळकर यांना न. चि. केळकर पुरस्कार, डॉ. उज्ज्वला सहाणे यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, सुधीर रसाळ यांना के. क्षीरसागर पुरस्कार, रमेश पतंगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, संजीवनी खेर यांना शाहू महाराज पुरस्कार, रामदास भटकळ आणि मृदुला प्रभुराम जोशी यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार, रमेश नारायण वरखेडे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, डॉ. नितीन मार्कण्डेय यांना वसंतराव नाईक पुरस्कार, श्रीराम पेडगावकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार, दिलीप घोंडगे यांना ना. गो. नांदापूरकर पुरस्कार, हेरंब कुलकर्णी यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, बी. के कुलकर्णी यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार, संपादक द. दि. पुंडे यांना रा. ना. चव्हाण पुरस्कार, अनुवादक अश्विनी भिडे-देशपांडे यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, डॉ.गिरीश जाखोटिया यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, डॉ. माणिक बंगेरी यांना सयाजीराव महाराज गायकवाड पुरस्कार यांचा समावेश आहे.
५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र पुरस्कार- इग्नेशिअस डायस यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार, नितीन थोरात यांना श्री. ना. पेंडसे पुरस्कार, ऋषिकेश वांगीकर यांना ग. ल. ठोकळ पुरस्कार, संदेश कुलकर्णी यांना ताराबाई शिंदे पुरस्कार, राजेंद्र सलालकर यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार, ज्ञानदा आसोलकर यांना बालकवी पुरस्कार, राजीव तांबे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार, तर मधुकर धर्मापुरीकर यांना ना. धों. ताम्हणकर आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Honor of Marathi Language Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.