सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने लष्करी संस्थेचा गौरव

By admin | Published: April 16, 2017 01:16 AM2017-04-16T01:16:02+5:302017-04-16T01:16:02+5:30

राष्ट्रपती व तिन्ही सेनादलांचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले.

The honor of the military authority of the Supreme President's standard | सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने लष्करी संस्थेचा गौरव

सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने लष्करी संस्थेचा गौरव

Next

अहमदनगर : राष्ट्रपती व तिन्ही सेनादलांचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अ‍ॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले. शनिवारी झालेल्या एका शानदार सोहळ्यात लष्कराचे उत्कृष्ट संचलन, रणगाड्यांचा ताफा, हेलिकॉप्टर व सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरतीने उपस्थित भारावले.
सन १९४८पासून देशसेवेत समर्पित आर्मर्ड कोअर सेंटरने त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श घातला आहे. एक शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा उत्तम रीतीने उपयोग केला आहे. नव्या आव्हानांना तोंड देत एसीसीएस भविष्यातही आपली गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात यशस्वी होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. येथील आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल प्रवीण
दीक्षित यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला.
प्रथम सैनिकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लेफ्ट. जनरल डी. आर. सोनी आदी प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली. राष्ट्रपतींचे मानक मिळणे हे कोणत्याही सैनिक तुकडीचा सर्वोच्च सन्मान व दुर्मीळ क्षण असतो. सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम हे निशाण करते.
पथसंचलनाचे नेतृत्व ब्रिगेडिअर संदीप झुंझा यांनी केले. संचलनात घोडेस्वार, लढाऊ रणगाडे तसेच जवानांनी विविध कसरती दाखवत सैन्य सज्जतेची झलक दाखवली.
लढाऊ सुखोई विमान तसेच चेतक हेलिकॉप्टरने आकाशातून ध्वजवहन करून सामर्थ्य प्रदर्शित केले. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘फर्स्ट डे कव्हर’चे अनावरण करण्यात झाले. ६९ वर्षांच्या कामगिरीच्या आधारे संस्थेला हा सर्वोच्च बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे. संस्थेला २ व्हिक्टोरिया क्रॉस, २ परमवीर चक्र, १६ महावीर चक्र तसेच ५२ वीर चक्रांनी सन्मानित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

‘एसीसीएस’च्या कामगिरीची ६९ वर्षे
अर्जुन, टी ९०, टी ७२, भीष्म, अजेय आदी अनेक भेदक रणगाडे एसीसीएसच्या ताफ्यात आहेत. भारतीय लष्कराबरोबरच मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते.

- अहमदनगर येथील आर्मर्ड कार्प सेंटर अ‍ॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले. एसीसी अ‍ॅण्ड एसचे कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल प्रवीण दीक्षित, लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला.

Web Title: The honor of the military authority of the Supreme President's standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.