गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

By admin | Published: July 15, 2016 11:40 AM2016-07-15T11:40:37+5:302016-07-15T11:45:53+5:30

महान गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा आज, १५ जुलै, जन्मदिवस. प्रसिद्ध गायिका मा.किशोरी अमोणकर यांच्या त्या मातोश्री होत्या.

Honorarium for the birth anniversary of Ganatpaswini Mogubai Kurdikar | गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली

Next
>संजीव वेलणकर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ -  महान गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा आज (१५ जुलै) जन्मदिवस.  १५ जुलै १९०४ रोजी जन्मलेल्या विदुषी मोगुबाई कुर्डीकर या प्रसिद्ध गायिका मा.किशोरी अमोणकर यांच्या मातोश्री. अत्रौली (जयपूर) घराण्याचे अत्यंत कठीण गायकीची महाराष्ट्रातील अनेक अभ्यास केला गेला आहे, पण ही परंपरा सर्वात चागल्या गायीका म्हणुन मान गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांना जातो. विदुषी मोगुबाई कुर्डीकर त्या वेळच्या परंपरेच्या मानाने उदारमतवादी होत्या. दुसऱ्या घराण्याचे गाणे शिकवण्यासाठी त्यांनी ताईंना अन्य गुरुजनांकडे जाण्याचे उत्तेजन दिले. जरी केसरबाई यांच्या प्रति मोगुबाई कुर्डीकर ची सांगीतिक स्पर्धा होती, तरीही मोगुबाई कुर्डीकर नी किशोरीताईंना केसरबाईंकडे शिकायला पाठवले. दुर्दैवाने काही कारणामुळे हे शिक्षण झाले नाही. ताईंना अन्यहि काही गुरु होते. मोहनराव पालेकरांची ताईंना काही वर्षे तालीम होती.त्याच्या शिष्य, शिष्या पैकी पद्मा तळवलकर, कमल तांबे , वामनराव देशपांडे, सुहासिनी मुळगावकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड, व  मा.किशोरी अमोणकर हे आहेत. विदुषी मोगुबाई कुर्डीकर या रागांचे भाव प्रकट करणार्या  स्वर व राग वैशिष्ट्यांचे विशेष महत्त्व लहानपणी किशोरीताईंना वारंवार समजावून सांगत असत. जयपूर घराण्याची गायकी ही आकारयुक्त असते. आकाराच्या स्वरूपात स्वरांचे अत्युच्च स्वरूप प्रकट होत असते. स्वरांच्या बिंदूचे किरण किंवा प्रकटणारी आभा किती गहन व खोल जाते, जयपूर घराण्यात शिकवताना रागांची नावे सांगितली जात नाहीत. विदुषी मोगुबाई कुर्डीकर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १० फेब्रुवारी २००१ रोजी मा.विदुषी मोगुबाई कुर्डीकर यांचे निधन झाले. 
लोकमत समूहातर्फे मा.विदुषी मोगुबाई कुर्डीकर यांना आदरांजली.
 

Web Title: Honorarium for the birth anniversary of Ganatpaswini Mogubai Kurdikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.