रायगडातील 13 शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने सन्मान

By admin | Published: September 4, 2014 11:07 PM2014-09-04T23:07:00+5:302014-09-04T23:07:00+5:30

भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Honored by the 13 teachers of the Ideal Award in Raigad | रायगडातील 13 शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने सन्मान

रायगडातील 13 शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने सन्मान

Next
जयंत धुळप ल्ल अलिबाग
भारताचे माजी राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हय़ातील 13 शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षकांबरोबरच जिल्ह्यातील 17 गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
       जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांतून 13 शिक्षकांची यंदा आदर्श शिक्षक पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे. यात माणगांवच्या रायगड शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माधव कुंटे, रोहा तालुक्यातील नागोठणो येथील पेट्रोकेमिकल विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर देशमुख, कळंबोली येथील सु.ए.सो. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक इक्बाल इनामदार, तळा तालुक्यातील उसरखुर्द येथील अभिनव ज्ञानमंदिरचे मुख्याध्यापक ब्रrादेव पुलसागर, पेण तालुक्यातील सावरसई येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण पालवे या पाच मुख्याध्यापकांचा समावेश असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी दिली. साहाय्यक शिक्षकांमध्ये सुधागडमधील  बबन ढाणो, श्रीवर्धन तालुक्यातील दशरथ कातकर, पोलादपूरमधील पैठण येथील न्यू इंग्लिश स्कूलचे साहाय्यक शिक्षक हरिश्चंद्र जाधव, कजर्त कळंब येथील  सुभाष देशमुख, म्हसळा तालुक्यातील गोंडघर येथील अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूलच्या सायरा टंगसाल यांचा समावेश आहे. 
उप शिक्षकांमध्ये अलिबागच्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जन.अरुणकुमार वैद्य माध्यमिक शाळेतील उप शिक्षक संगीत विशारद सुनील म्हात्रे व खालापूरमधील चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिरचे उप शिक्षक देवानंद कांबळे तर शिक्षकांमध्ये उरणमधील मोरा येथील को.ए.सो.न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक राजाराम पाटील यांचा समावेश आहे.
 
दहावी-बारावी गुणवंतांचाही गौरव : दहावीच्या परीक्षेत विशेष नैपुण्यप्राप्त गुणवंत विद्याथ्र्यामध्ये, शिवानी चिखले (97.4क्टक्के), शिवानी देसाई (97.2क् टक्के), स्वाती वारघडे (97.2क् टक्के), आभा करमरकर (97.2क्टक्के), मेलबा जॉर्ज (96.8क् टक्के), जयेन कल्याण (96.8क् टक्के), अनमोल राणो (96.8क्टक्के), शादरुल परांजपे (96.6क्टक्के), मनस्वी पाटील (96.4क्टक्के), प्रतीक्षा खामकर (96.4क्टक्के), अवनी मोहिते (96.4क्टक्के) व जयेन सुरेश (96.4क्टक्के) यांचा समावेश आहे. बारावी विशेष नैपुण्यप्राप्त विद्याथ्र्यामध्ये मयूरी पोरवाल (सी.के.टी.पनवेल), प्रणाली पानेरे (सेंट जोसेफ,कळंबोली),समृद्धी गांधी (इंग्लीश मिडीयम, पनवेल), ऐश्वर्या भावसारे (व्ही.के.हायस्कूल,पनवेल), रविराज घरत (सेंट जोसेफ, कळंबोली) यांचा समावेश आहे.

 

Web Title: Honored by the 13 teachers of the Ideal Award in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.