राज्याला भरली हुडहुडी

By admin | Published: November 7, 2016 06:52 AM2016-11-07T06:52:34+5:302016-11-07T06:52:34+5:30

यंदा परतीचा पाऊस लांबल्यानंतर ‘आॅक्टोबर हीट’ची दाहकता न जाणवताच राज्यात थंडीचे जोरदार आगमन झाले आहे.

Hoodhog filled the state | राज्याला भरली हुडहुडी

राज्याला भरली हुडहुडी

Next

पुणे/नाशिक : यंदा परतीचा पाऊस लांबल्यानंतर ‘आॅक्टोबर हीट’ची दाहकता न जाणवताच राज्यात थंडीचे जोरदार आगमन झाले आहे. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मागील दोन दिवसांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात नाशिक गारठले असून देशातील नीचांकी ११़४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यातही तापमानात घट झाली आहे. मुंबईतही थंडीची चाहुल आहे. राज्यात पुढील काही दिवस तापमान कमीच असेल. नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या पंधरवाड्यात थंडी आणखी वाढेल. तर डिसेंबरमध्ये काही भागात ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जावू शकते, अशी माहिती कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी लोकमतला दिली.


राज्यातील थंडीमान
नाशिक ११़४, पुणे १२़३, महाबळेश्वर १२़७, जळगाव १३, अमरावती १३़२, मालेगाव १३़४़, यवतमाळ १३़४, सातारा १४़९, नागपूर १५़१, अकोला १५़४, औरंगाबाद १५़४, परभणी १५़५, सांगली १५़७, बुलडाणा १६, चंद्रपूर १६़४, सोलापूर १६़९, वर्धा १७, नांदेड १७़५, कोल्हापूर १७़७, गोंदिया १८़१, रत्नागिरी १९़३, वाशिम १९़४, पणजी १९़५, अलिबाग २०़१, मुंबई २३.
आकडेवारी अंश सेल्सियसमध्ये

Web Title: Hoodhog filled the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.