लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवर खुलेआम निघतोय हुक्क्याचा धूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 10:13 AM2017-12-31T10:13:40+5:302017-12-31T10:13:49+5:30

लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉईटवर आज थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

Hookika's smoke is coming out openly at Lions Point in Lonavla | लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवर खुलेआम निघतोय हुक्क्याचा धूर

लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवर खुलेआम निघतोय हुक्क्याचा धूर

Next

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेल्या लायन्स पॉईटवर आज थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला खुलेआम हुक्क्यांचा धूर निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. सायंकाळच्या सत्रात लायन्स पॉईटवर सनसेट पाहण्याकरिता तोबा गर्दी झाली होती.

पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात थर्टी फस्ट व नविन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याकरिता मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताकरिता सज्ज झालेले बहुतांश सर्व हॉटेल, सेनेटोरियम, बंगले, सेकंड होम पर्यटकांनी गजबजली आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला भुशी धरणाचा परिसर, लायन्स पॉईट, शिवलिंग पॉईट, गिधाड तलाव, खंडाळ्यातील राजमाची गार्डन, ड्युक्स नोज व सनसेट पॉईट ही ठिकाणे पर्यटकांनी फुल झाली होती. लायन्स पॉईट येथे पोलीस प्रशासन तसेच वन विभागाचा कसलाही अंकूश नसल्याने खुलेआम उघड्यावर हुक्का पिणार्‍याची जत्राच बसली असल्याचे चित्र पहायला मिळत होते. कौठुंबिक पर्यटकांच्या समोर काही युवक व युवती खुलेआम टेबलवर हुक्का ठेवत धूर काढत होते तर स्थानिक व्यावसायीक त्यांना आवश्यक ते साहित्य पुरवत होते. काही उच्चभ्रु पर्यटक मोकळ्या मैदानात दारु पित हुक्क्याचा धूर काढत होते. अनेक उत्साही तरुण लायन्स पॉईटच्या कड्याला लावलेले लोखंडी रेलिंगच्या पुढे जाऊन धोकादायकपणे सेल्फी काढत होते.

वन विभागाच्या ताब्यात असलेले लायन्स पॉईट हे ठिकाणी लोणावळा शहरापासून बारा किमी अंतरावर असून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. आज थर्टी फस्टच्या पुर्वसंध्येला याठिकाणी हजारो लोक एकत्र आले होते. काही जण गाडीमधील म्युझिम सिस्टिमचा आवाज मोठा करुन नाचत होते तर काही जण दारु पित होते, हुक्का ओढत होते असे विदारक चित्र पहायला मिळाले. लायन्स पॉईटची नाईट लाईफ मोडून काढण्याकरिता मागीला काळात पोलीसांनी कारवाया केल्या होत्या. सायंकाळी सातनंतर हा परिसर निमनुर्ष्य करण्याचे फलक गेटवर झळकत असले तरी वास्तवात रात्रभर याठिकाणी दारु व हुक्क्याच्या पार्ट्या सर्रास सुरु असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पोलीसांच्या व वन विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुनच काही व्यावसायीक याठिकाणी दारु व हुक्का पुरवत असल्याची शहरात चर्चा आहे. 

पार्किंगचा गोरखधंदा तेजीत

लायन्स पॉईट याठिकाणी संयक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून येणार्‍या वाहनांकडून पावती देऊन पार्किंगचे पैसे गोळा केले जातात. आज मात्र लायन्स पॉईटवर पाहणी केली असता वाहनचालकांना कसलिही पावती न देता सर्रास पैसे गोळा करण्याचा प्रकार सुरु असल्याचे पहायला मिळाले. हा पैसा नेमका कोणाच्या खिशात जाणार हा संशोधनाचा विषय असला तरी विकासाच्या नावाखाली जमा केला जाणारा पैसा लाटण्याचा गोरख धंदा याठिकाणी सुरु असल्याचे पहायला मिळाले.

Web Title: Hookika's smoke is coming out openly at Lions Point in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.