साताऱ्याजवळ दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात, १ ठार
By Admin | Published: November 22, 2015 09:57 AM2015-11-22T09:57:12+5:302015-11-22T18:52:45+5:30
खंबाटकी बोगद्याजवळील एस. वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन खासगी लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि.२२ - खंबाटकी बोगद्याजवळील एस. वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन खासगी लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे ४च्या सुमारास घडली आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण तसेच शिरवळ येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
खंबाटकी बोगद्याजवळ दोन खासगी बसेसची समोरसमोर जोरदार धडक बसली. त्यामध्ये ठाण्यातील दिपक निकम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही बसमधील मिळून ३७ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमी प्रवाश्याची स्थिती गंभीर असल्याचं समजते आहे, तर दोन्ही बसेसला क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरुन हलवण्यात आले असून रसत्यावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.