सारंगखेड्यात होणार अश्वसंग्रहालय
By admin | Published: December 22, 2016 03:50 AM2016-12-22T03:50:50+5:302016-12-22T03:50:50+5:30
सारंगखेडा येथील घोडेबाजाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी पर्यटन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. येथे जागतिक
नंदुरबार : सारंगखेडा येथील घोडेबाजाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी पर्यटन विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. येथे जागतिक दर्जाचे अश्वसंग्रहालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.
सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलनिमित्त उत्तर महाराष्ट्रस्तरीय रत्नगौरव पुरस्कार वितरण व पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री म्हणाले, सारंगखेडा येथील घोडे बाजाराला तीन ते चार शतकांची परंपरा आहे. या यात्रेला आणि येथील घोडेबाजाराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. येथे घोड्यांच्या विविध जाती, प्रजाती, उत्पत्ती यांचे संशोधन स्थानिक स्तरावर व्हावे आणि चांगल्या प्रजातीच्या घोड्यांची उत्पत्ती व्हावी, अश्व संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याचा देखील प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या कामास दोन दिवसांत सुरुवात होणार असून जगातील ते सर्वात भव्य स्मारक राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चार शतकांची परंपरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सारंगखेडा येथील घोडे बाजाराला तीन ते चार शतकांची परंपरा आहे. देशभरातील विविध जातींचे घोडे या ठिकाणी येत असतात. त्यामुळे या यात्रेला आणि येथील घोडेबाजाराला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या कामास दोन दिवसांत सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.