दहीहंडी पाहण्याच्या मोहात गाठले रुग्णालय

By admin | Published: August 26, 2016 04:45 AM2016-08-26T04:45:00+5:302016-08-26T04:45:00+5:30

दहीहंडी उत्सवाचा थरार पाहण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या तीन तरुणांना हा मोह भलताच महागात पडला.

Hospital reached the Dahihandi watch center | दहीहंडी पाहण्याच्या मोहात गाठले रुग्णालय

दहीहंडी पाहण्याच्या मोहात गाठले रुग्णालय

Next


मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार पाहण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या तीन तरुणांना हा मोह भलताच महागात पडला. फ्री-वेवरुन भरधाव निघालेल्या तरुणांच्या कारचा अपघात झाल्याने त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याची घटना वडाळा येथे घडली.
नवी मुंबई परिसरात राहणारा अजगर अली खान (२२) हा त्याच्या दोन मित्रांसोबत फोर्ड कारने मुंबईला येत होता. मुंबईतील दहिहंडीचा थरार पाहण्यासाठी तिघे निघाले होते. फ्रि वे वरून भरधाव वेगाने जात असताना कारवरील ताबा सुटल्याने त्यांची कार रस्त्याच्याकडेला असलेल्या लोखंडी रॉडला धडकली. दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या अपघातात खान आणि त्याचा मित्र शेखर (२०) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहीती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या वडाळा पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तपास सुरू असून कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक परशुराम कार्यकर्ते यांनी दिली.

Web Title: Hospital reached the Dahihandi watch center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.