राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 06:17 PM2020-07-05T18:17:48+5:302020-07-05T18:19:33+5:30
हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यभरातील उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. अनलॉकच्या दोन टप्प्यांमध्ये सारेच व्यवसाय सुरु झाले होते. मात्र, हॉटेल व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी केवळ पार्सल देण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. आता राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असून याची कार्यपद्धती निश्चित करणे सुरु असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या पर्यटनात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते. यावेळी ठाकरे यांनी हॉटेल मालकांना कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करू नका असे आवाहन केले आहे.
हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात येऊ शकतात. राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये संवाद साधला.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 5, 2020
याचबरोबर मुंबई, ठाण्यासह इतर मोठ्या शहरांत व्यवहार सुरु करताना भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेतली. त्यानंतर जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांना खूप मदत केली. कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत
WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली
पुण्यात खळबळ उडाली! महापौरांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण; आठ जण बाधित
कार विकत घ्यायची की भाड्याने? कोणता पर्याय परवडतो? जाणून घ्या फायदे तोटे
मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख
OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV
बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार