हॉटेल्स सुरक्षा ‘रामभरोसे’

By admin | Published: December 19, 2014 12:55 AM2014-12-19T00:55:01+5:302014-12-19T00:55:01+5:30

विदेशी पाहुण्यांची वर्दळ असताना उपराजधानीतील अनेक पॉश हॉटेल्समध्ये पाहिजे तशी चांगली सुरक्षा व्यवस्था नाही. दंडुका हातात घेतलेले प्रवेशद्वारावरचे दोन गार्ड म्हणजेच हॉटेलची सुरक्षा, असे समीकरण अनेक

Hotels Security 'Ram Bharose' | हॉटेल्स सुरक्षा ‘रामभरोसे’

हॉटेल्स सुरक्षा ‘रामभरोसे’

Next

धक्कादायक वास्तव : धोक्याची घंटा दुर्लक्षित
नागपूर : विदेशी पाहुण्यांची वर्दळ असताना उपराजधानीतील अनेक पॉश हॉटेल्समध्ये पाहिजे तशी चांगली सुरक्षा व्यवस्था नाही. दंडुका हातात घेतलेले प्रवेशद्वारावरचे दोन गार्ड म्हणजेच हॉटेलची सुरक्षा, असे समीकरण अनेक हॉटेल प्रशासनाने केले आहे. त्यामुळे ही ‘रामभरोसे सुरक्षा’ चिंतेचा विषय ठरली आहे.
सिडनीमधील ‘थरारक ओलिस नाट्या’नंतर सुरक्षेचा मुद्दा सर्वत्र चर्चेला आला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात दोन डझनावर पॉश हॉटेल्स आहेत. यातील वर्धा मार्ग, रामदासपेठ, सीताबर्डी, सदर, सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील हॉटेल्समध्ये विदेशी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. यातील चार ते सहा हॉटेल्स सोडले तर इतर हॉटेल्समधील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. येथील प्रवेशद्वारावर कडक ‘सॅल्युट’ ठोकणारे गार्ड आढळतात. परंतु बहुतांश हॉटेलमध्ये बॅग तपासणारे स्कॅनर नाहीत. अनेक हॉटेल्समधील मागच्या भागातून सहजपणे आतमध्ये जाता येऊ शकते; सोबत स्फोटके, घातपाताचे साहित्यही सहज नेता येऊ शकते. माहीत असूनही याकडे हॉटेल प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. हा दुर्लक्षितपणा ‘ओलिस नाट्या’सारख्या भयावह धोक्याला आमंत्रण ठरू शकते.
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
हॉटेलच्या आत आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्था चांगली ठेवा, पार्किंगवरही विशेष लक्ष ठेवा. येणाऱ्या- जाणाऱ्यांवर लक्ष ठेवा, प्रत्येकाची नोंद घ्या, संशयास्पद व्यक्तीची तातडीने पोलिसांना माहिती द्या, अशा सूचना हॉटेल प्रशासनाला पोलिसांकडून वारंवार दिल्या जातात. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. अनेक हॉटेलच्या बाहेर सीसीटीव्ही नाहीत. सुरक्षेच्या नावाखाली केवळ सिक्युरिटी गार्ड उभा दिसतो. त्यामुळे पाहुणा बनून आलेल्या दहशतवाद्याकडून हॉटेलमध्ये प्रवेश मिळवण्याचा तसेच ओलिस ठेवण्याचा धोका नाकारता येत नाही. या धोक्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे हॉटेल्स प्रशासनाला वेळोवेळी सांगण्यात येते. आम्ही वेळोवेळी तपासणी करतो. पोलीस आपल्यापरीने खबरदारीचे सर्व उपाय करतात. काय आहे, काय नाही, ते उघड करण्याची गरज नाही. कोणतीही स्थिती उद्भवल्यास ती निपटून काढण्यासाठी नागपूर पोलीस सक्षम आहेत.
कौशल किशोर पाठक
पोलीस आयुक्त नागपूर

Web Title: Hotels Security 'Ram Bharose'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.