तासगावला जागतिक बेदाणा निर्यात केंद्र

By admin | Published: March 5, 2017 12:32 AM2017-03-05T00:32:47+5:302017-03-05T00:32:47+5:30

सदाभाऊ खोत यांची घोषणा : अधिकाऱ्यांसह दौरा करणार

Hourly Global Curb Export Center | तासगावला जागतिक बेदाणा निर्यात केंद्र

तासगावला जागतिक बेदाणा निर्यात केंद्र

Next

सांगली : तासगावसह जत, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, वाळवा, पलूस तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. बेदाणा उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून तासगावकडे पाहिले जाते. त्यामुळे तासगावात जागतिक दर्जाचे बेदाणा
निर्यात केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, उत्पादित शेतीमालास योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली तरच शेती फायदेशीर ठरणार आहे. हे ओळखूनच केंद्र आणि राज्य शासनाने बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्रातील मोजक्या जिल्ह्यांत द्राक्षे आणि बेदाणा उत्पादन घेतले जाते. नाशिकनंतर सर्वाधिक द्राक्षे व बेदाणा उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सांगलीचा उल्लेख करावा लागेल. येथील अनेक द्राक्ष उत्पादक स्वत: नवनवीन जातींचा शोध घेऊन उत्तम दर्जाचा बेदाणा तयार करीत आहेत. या बेदाण्यास जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तासगावात जागतिक दर्जाचे बेदाणा निर्यात केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने लवकरच केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी यांच्यासोबत तासगाव तालुक्याचा दौरा करून पाहणी करणार आहोत. त्यानंतर निर्यात केंद्र कसे असावे आणि तेथे कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याविषयी निर्णय घेण्यात येईल. घरी ते व पत्नी असे दोघेच राहत होते. शुक्रवारी (दि. ३) राहत्या घरी त्यांचा निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. ही हत्या शेजारीच राहणारा प्रीतम पाटील याने आर्थिक व्यवहाराच्या वादातून केल्याचे त्याचा मित्र विजयसिंह राजपूत याने पोलिसांना सांगितले. संशयित पाटील हा पसार झाल्याने त्याला तत्काळ अटक करणे पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यासाठी पोलिसांनी बेळगाव, शाहूवाडी, मलकापूर, रत्नागिरी, हुपरी या ठिकाणी पथके रवाना केली. तो हाती आल्यानंतरच हत्येमागचे रहस्य उलगडणार होते. दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी सीपीआर रुग्णालयाच्या शवगृहाबाहेर ठिय्या मांडून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत किरवले यांचे पार्थिव ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव पसरला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित प्रीतम पाटील याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो शाहूवाडीमध्ये असल्याचे दिसून आले. पोलिसांना दुपारी तो शाहूवाडी-मलकापूर रस्त्यावरील एका पडक्या मंदिरात लपून बसलेला मिळून आला. त्याच्यासह दुचाकी (एम एच ०९ बीक्यू ८९१६) पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याला राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता हत्या केल्याची कबुली दिली.
आरोपीचा कबुलीजबाब
डॉ. किरवले आणि माझ्या वडिलांचे मैत्रीसंबंध असल्याने सहा महिन्यांपूर्वी त्यांना बंगला दुसऱ्या कोणाला विकू नका, आम्हीच घेतो असे सांगितले. बाजारभावाप्रमाणे बंगल्याची किंमत ४६ लाख रुपये ठरली. मी नातेवाईक, मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन २६ लाख रुपये किरवले यांना दिले. उर्वरित २० लाख रुपये रजिस्ट्रेशन करताना द्यायचे ठरले. शुक्रवारी (दि. ३) दुपारी दस्त नोंदणी कार्यालयात मी, वडील व डॉ. किरवले असे तिघेजण गेलो. बंगल्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे संचकारपत्र केले. त्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही घरी आलो. किरवले यांनी मला व वडिलांना पुन्हा चार वाजण्याच्या सुमारास घरी बोलावून घेतले. त्यांनी ठरलेल्या व्यवहारापेक्षा जास्त रकमेची मागणी केली. यावरून आमच्यात शाब्दिक वादावादी झाली. वडील शेजारी परीट यांच्या घरी सुतारकाम असल्याने निघून गेले. त्यानंतर मी किरवले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पैसे वाढवून दिल्याशिवाय रजिस्ट्रेशन करणार नाही, तुला काय करायचे ते कर, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विचित्र स्वभावामुळे माझा राग अनावर होऊन झटापट झाली. यावेळी सोबत असलेल्या पिशवीतील धारदार एडका (शस्त्र) घेऊन मी त्यांच्या डोक्यात पहिला वार केला. त्यांच्या ओरडण्याने त्यांची पत्नी स्वयंपाकघरातून बेडरूममध्ये धावत आल्या. मी किरवले यांना धरून ठेवलेले पाहून त्यांनी माझ्या हाताच्या बोटांचा चावा घेतला. त्यावर हिसडा मारून त्यांना मी बाहेर ढकलले व रूमचा दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर किरवले हे माझ्या हातातून सुटून ओरडत धावत वर दुसऱ्या मजल्यावर गेले. त्यांच्या मागोमाग जाऊन मी त्यांचा गळा चिरला. ते मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर तेथून मी पसार झालो.
एका-एकाला चिरून टाकीन
डॉ. किरवले यांच्या हत्येनंतर संशयित प्रीतम पाटील याचे कपडे रक्ताने माखले होते. त्याने फोन करून आईला घरातून पॅँट आणण्यास सांगितली. आईने काही वेळातच पिशवीतून पॅँट आणून दिली. रक्ताने माखलेली पॅँट व एडका पिशवीत ठेवून ती स्वयंपाकघरातील कट्ट्यावर ठेवली. आईला ‘मी आता जातोय, ती पिशवी घेऊन घरी जा,’ असे सांगून तो बाहेर आला. किरवले यांच्या घरासमोर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी त्याने मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर एका-एकाला चिरून टाकीन, अशी धमकी दिली. या धमकीमुळे त्याला पकडण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. तेथून घरी येऊन पत्नीला भेटून तो स्वत:ची दुचाकी घेऊन पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
---------------
कोट :
डॉ. किरवले यांच्या हत्याप्रकरणी संशयित प्रीतम पाटील व त्याची आई मंगला पाटील या दोघांना अटक केली आहे. त्याच्या वडिलांचा सहभाग आढळून आल्यास त्यांनाही आरोपी केले जाईल. आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करीत आहोत.
- एम. बी. तांबडे : पोलिस अधीक्षक


महिन्यात आसामला शेतीमाल पाठविणार
आसाममध्ये भाजीपाला, धान्य, द्राक्षे, बेदाण्याला जास्त मागणी आहे. त्याचा विचार करून येत्या महिन्यात प्रवासी रेल्वे गाडीलाच गरजेनुसार एक-दोन शेतीमालाचे डबे जोडण्यात येणार आहेत. शेतकरी बचत गट व कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील शेतीमाल प्रथम आसामला पाठविणार आहोत. त्यानंतर अन्य राज्यांत शेतीमाल पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
कडधान्यावरील साठाबंदीचे आदेश रद्द
तूरडाळीचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी कडधान्याच्या साठ्यावर शासनाने निर्बंध घातले होते; परंतु, सध्या तूरडाळीचे दर स्थिर झाल्यामुळे आणि तुरीचे उत्पादनही यावर्षी विक्रमी झाल्याने कडधान्याच्या साठ्यावरील निर्बंध उठविले आहेत, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.

Web Title: Hourly Global Curb Export Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.