गिरणी कामगारांसाठी घरांची सोडत २ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 02:43 AM2016-11-19T02:43:17+5:302016-11-19T02:43:17+5:30

कोन येथे बांधण्यात आलेल्या २ हजार ४१७ सदनिकांची सोडत म्हाडातर्फे २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे पूर्वेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

The house for the mill workers will be held on December 2 | गिरणी कामगारांसाठी घरांची सोडत २ डिसेंबरला

गिरणी कामगारांसाठी घरांची सोडत २ डिसेंबरला

Next


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने गिरणी कामगारांसाठी पनवेल तालुक्यातील कोन येथे बांधण्यात आलेल्या २ हजार ४१७ सदनिकांची सोडत म्हाडातर्फे २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे पूर्वेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.
एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटांच्या दोन सदनिका (परिस्थितीनुरूप शक्य असलेली जोडघरे) याप्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी 6 लाख रुपये आकारून गिरणी कामगारांना वितरित करण्यात येणार आहेत.
स्वान मिल कुर्ला/शिवडी या मिलच्या अर्जदारांना उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.
सोडतीत म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १ लाख ४८ हजार ७११ गिरणी कामगार/वारस यांच्या यादीमधून २०१२च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, २०१२च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिमत: अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमधील अर्जदार तसेच म्हाडाच्या मे-२०१६च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना या सोडतीतून वगळण्यात येत असून, उर्वरित अर्जदारांचा सोडत प्रक्रियेत समावेश असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The house for the mill workers will be held on December 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.