वाड्यात श्रमजीवीने वाचला समस्यांचा पाढा
By admin | Published: August 2, 2016 03:30 AM2016-08-02T03:30:26+5:302016-08-02T03:30:26+5:30
आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली.
वाडा : आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र या कालावधीत शासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे जिल्ह्यातील कुपोषण, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्यात अधिकच भर पडल्याने व त्या सोडविण्यात शासन अपूरे पडल्याने त्या विरोधात शासनाला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या पारंपारिक रवाळ पध्दतीने देवाला साकडे घालून सोमवारी तहसील कार्यालया समोर अनोखे आंदोलन केले.
१ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ज्या कुपोषण आणि बालमृत्यू व आरोग्याचा समस्यांवर पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ते प्रश्न अधिक गंभीर बनून सरकार उदासिन असल्याचे दिसते. जिल्ह्यÞात महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांची फक्त तीन पदे भरली असून आठ पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या अब्दुल कलाम सकस आहार योजनेचा पुरता बोजवारा उडाला. या योजनेत गर्भवती महिलेस सातव्या महिन्या पासून सकस आहार दिला जातो. पंरतु तीही योजना गंभीर पणे राबविली जात नसल्याने कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यÞात आरोग्य सेवेची दुर्दशा झाली असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रूग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ, भुलतज्ञ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांची परवड अधिक वाढली आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले.
खरंतर या जिल्हा निर्मिती नंतर आदिवासी भागातील प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहायला हवे होते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी भागातील जनतेला मरणयातना भोगाव्या लागत आहेत. अशा उदासीन सरकारला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या देवाला साकडे घालण्याच्या पारंपरिक रवाळ पध्दतीने पूजा घालून गाणी गात तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.पूर्वीच्या काळी ग्रामीण आदिवासी भागात वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याने आदिवासी समाज आपली पारंपरिक उपचार पद्धती अवलंबित असे.
आजही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी जिल्ह्यÞातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने आदिवासींवर पुन्हा अंधश्रद्धा जोपासत भगतिगरी व बुवाबाजीवर अवलंबून राहावे लागणार असल्याचा प्रसंग ओढवणार आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून रवाळ पध्दतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, संघटक सरिता जाधव, जयराम बरफ, बाळाराम पाडोसा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)
जव्हारमध्येही आंदोलन
जव्हार : श्रमजीवी संघटनेकडून सरकारला शुद्ध येण्याकरीता जिल्ह्यातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आदिवासी रवाळ भरवून नवस बोलण्यात आले. संघटनेकडून हे आंदोलन सोमवार तहसील कार्यालयाच्या आवारात आदिवासीसमाजाचे तारपा व इतर वाद्य वाजवून रवाळ पध्दतीने देवालासाकडे घालण्यात आले. ठाणे जिल्ह्रयाचे विभाजन होऊन आदिवासी बहूलक्षेत्र असलेल्या पालघर जिल्हयाची निर्मिती होऊन १ आॅगस्ट २०१६ रोजी २ वर्ष पुर्णझाली. दोन वर्षापुर्वी निवडणूका डोळयासमोर ठेवून कुठलीही पूर्व तयारी नसताना जिल्हयाची निर्मिती झाली. परंतु जिल्हयासाठी आवश्यक असलेले प्रशासन व त्यसाठी लागणारे मनुष्याळ आपल्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्हयाला अद्याप दिलेले नाही हे संघटनेद्वारे निदर्शनास आणले आहे.