दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी नवरा बनला घरफोड्या...

By admin | Published: December 26, 2015 01:13 AM2015-12-26T01:13:43+5:302015-12-26T09:03:29+5:30

दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी एका नवऱ्यावर घरफोड्या बनण्याची वेळ ओढावल्याची घटना दादर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून समोर आली. अनंत पांडुरंग

Housewife became husband to give up the beauty of two women ... | दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी नवरा बनला घरफोड्या...

दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी नवरा बनला घरफोड्या...

Next

- मनीषा म्हात्रे,  मुंबई

दोन बायकांची हौस पुरविण्यासाठी एका नवऱ्यावर घरफोड्या बनण्याची वेळ ओढावल्याची घटना दादर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून समोर आली. अनंत पांडुरंग भालेकर (४५) असे या ‘पराक्रमी’ नवऱ्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल सात घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. मुंबईसह रायगड, ओरिसामध्ये त्याने धुमाकूळ घातला होता.
वरळी कोळीवाडा परिसरात भालेकर राहण्यास असून बिगारीचे काम करतो. काही वर्षांपूर्वी कुटुंबियांच्या संमतीने त्याचा लक्ष्मी (नावात बदल) सोबत विवाह झाला. बिगारीचे काम करत असताना त्याचा रेश्मावर (नावात बदल) जीव जडला. तिच्या आधुनिक राहणीमानामुळे तिच्याशी दुसरा विवाह करुन
तिला दादर परिसरात भाड्याच्या
घरात ठेवले.
लक्ष्मीकडून दोन तर रेश्माकडून त्याला तीन मुले झाले. एकीकडे घरखर्चासाठी पत्नीची किटकिट तर दुसरीकडे महागड्या वस्तुंसाठी रेश्माचा सुरु असलेला अट्टाहास भागवायचा कसा? असा प्रश्न त्याच्यासमोर होता.
दोन बायकांची हौस भागविण्यासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने सुरुवातीला तो छोट्या चोऱ्या करु लागला. त्यापाठोपाठ त्याने घरफोडी करणे सुरु केले. बिगारीचे काम करत असताना तो परिसरातील बंद घरांची रेकी करायचा. मध्यरात्रीच्या सुमारास जाऊन घरफोडी करुन तो पळ काढत असे. मिळालेल्या पैशातून तो दोन्ही पत्नींची हौस भागवण्याचे काम करत होता. तो बिगारी काम करत असल्याने त्याच्या दोन्ही बायकांना दोन लग्नाबाबत थांगपत्ताच नव्हता. मुंबईसह रायगड, ओरिसा या भागातही बिगारी कामासाठी गेला असताना त्याने घरफोड्या करुन पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते.
दादर परिसरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे वरिष्ठ निरीक्षक निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपाली कुलकर्णी यांच्या तपास पथकाने अधिक शोध सुरु केला. त्यांच्या तपास पथकामध्ये पीएसआय संभाजी खामकर, अंमलदार पाटील, सागर तांबकट, उज्ज्वल सावंत, गुलाबराव फापाळे आणि राठोड यांचा समावेश होता. भालेकर दादरमध्ये घरफोडीसाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. मुद्देमाल जप्त करण्यासाठी तपास पथकाने वरळी येथील घराची झडती घेतली. त्यामध्ये हाती काहीच लागल्यानंतर भालेकरने दादर येथेही भाड्याने खोली घेतल्याची माहिती मिळाली.
तेथे गेल्यानंतर तपास पथकाला भालेकरची दुसरी बायको दिसून आली. तिच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत ही बाब उघड झाल्याने पोलिसही चक्रावले. हौस भागविण्यासाठी आरोपी कुठल्या थराला पोहोचू शकतात, याचा प्रत्यय भालेकरच्या प्रतापातून समोर आला.

Web Title: Housewife became husband to give up the beauty of two women ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.