गृहनिर्माण नियमन आॅगस्टपासून प्रभावी

By admin | Published: July 26, 2015 04:18 AM2015-07-26T04:18:20+5:302015-07-26T04:18:20+5:30

शिक्षण, बँकिंग व फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना वांद्रे येथील ताज लॅन्डस एन्ड हॉटेलमध्ये ‘लोकमत नॅशनल एक्सिलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात शुक्रवारी

Housing Regulation Effective from August | गृहनिर्माण नियमन आॅगस्टपासून प्रभावी

गृहनिर्माण नियमन आॅगस्टपासून प्रभावी

Next

‘लोकमत’चा पुरस्कार सोहळा : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई : गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता यावी, सातत्यपूर्ण विकास साधला जावा, त्याचवेळी नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना चाप बसावा यासाठी गृहनिर्माण नियमन कायद्याची आॅगस्टमध्ये प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिक्षण, बँकिंग व फायनान्स, रिअल इस्टेट क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना वांद्रे येथील ताज लॅन्डस एन्ड हॉटेलमध्ये ‘लोकमत नॅशनल एक्सिलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्यात शुक्रवारी गौरविण्यात आले. या वेळी ‘लोकमत’चे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी स्वागतपर भाषणात अधोरेखित केलेल्या गृहनिर्माण कायद्याच्या मुद्द्याला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हात घातला.
फडणवीस यांचे स्वागत करत दर्डा म्हणाले, आजघडीला गृहनिर्माण क्षेत्रात म्हणजेच बांधकाम क्षेत्रात लोक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरील बांधकाम क्षेत्राकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. सद्य:स्थितीत या क्षेत्रातील गुंतवणूक कोट्यवधींच्या घरात आहे. असे असतानादेखील बांधकाम क्षेत्र लोकांच्या गरजा पूर्ण करत नाही. या क्षेत्रातील प्रश्न चुटकीसरशी सुटत नाहीत. बांधकाम क्षेत्रात पर्यावरणीय मंजुरी मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय इतर अनेक अडथळे असतात. यासाठी गृहनिर्माण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तर बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता वाढेल, कामात सातत्य आणि नियमितता येईल, अशी अपेक्षाही दर्डा यांनी या वेळी व्यक्त केली.
फन अ‍ॅण्ड जॉयचे संचालक डॉ. आर.एल. भाटिया यांनी या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर मोहन ग्रुप या सोहळ्याचे टायटल स्पॉन्सर, सिद्धीटेक ग्रुप को-स्पॉन्सर, टीजेएसबी बँक बँकिंग पार्टनर आणि टॉपलाइन कन्स्ट्रक्शन कंपनी असोसिएट स्पॉन्सर होते.
याप्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आणि ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला
आणि कार्यकारी संपादक (मुंबई) विनायक पात्रुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर दुपारी झालेल्या सोहळ्याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख,
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, म्हाडाचे उपाध्यक्ष
आणि सीईओ एस. एस. झेंडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२पर्यंत सर्वांना घराचे स्वप्न बाळगले आहे. त्याला साद देत राज्याचे गृहनिर्माण क्षेत्र वाटचाल करेल.
ते केवळ संपन्न लोकांसाठी नसेल तर ‘लोकमत’ ज्या सामान्य वाचकांचे अनेक वर्षे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करीत आहे अशा सामान्य माणसांसाठी ते असेल.
आज म्हाडा अन् एसआरएच कॉमन मॅनसाठी घरे बांधतात. बांधकाम क्षेत्रातील लोकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. गृहनिर्माण प्रकल्प लालफीतशाहीमध्ये आणि भ्रष्टाचारात अडकणार नाहीत याची मी ग्वाही देतो.
गृहनिर्माण क्षेत्रासाठी स्वतंत्र कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यास आपले सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सर्वसामान्यांची कामे निश्चित कालावधीत होणार
उद्योगांच्या उभारणीला परवानग्यांपायी होणारा विलंब टाळला जाईल. त्यासाठीची निश्चित योजना तयार करण्यात आली असून, त्याचे परिणाम लवकरच दिसतील. मोठ्या हॉटेल्ससाठी लागणारे १४८ परवाने २० वर आणले जात आहेत. सेवा हमी कायद्याने सरकार दरबारी सामान्यांची कामे निश्चित कालावधीत होतील. त्यासाठी आम्ही कायदा केला आहे. नवी मुंबईतील नयना प्रकल्पा अंतर्गत ३० स्मार्ट शहरे वसविण्यात येणार आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Web Title: Housing Regulation Effective from August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.