कसा होणार जिल्हा हगणदरीमुक्त?

By admin | Published: June 28, 2016 12:54 AM2016-06-28T00:54:28+5:302016-06-28T00:54:28+5:30

शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे.

How to become a district free of cost? | कसा होणार जिल्हा हगणदरीमुक्त?

कसा होणार जिल्हा हगणदरीमुक्त?

Next


पुणे : शासन हगणदरीमुक्त राज्य करण्यासाठी आग्रही असून, अतिक्रमित कुटुंबीयांनाही शौचालयासाठी अनुदान देण्यास तयार होत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य आपला तालुका निर्मल करण्यास उत्सुक नसल्याचे मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
७५ गटांपैकी २१ गटांत अद्याप ७0 टक्केही काम झाले नसून, इंदापूर तालुका सर्वांत मागे आहे. येथील एकाही सदस्यला आपला गट ६0 टक्केच्यावर हगणदरीमुक्त करता आला नाही. विशेष म्हणजे हा तालुका माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा असून तेथे आतापर्यंत सर्वाधिक योजनांचा लाभ मिळाला आहे.
दरम्यान, १२ मे २0१६ रोजी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपला जिल्हा यंदा हगणदरीमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जिल्ह्यात १४0६ ग्रामपंचायती असून, त्यापैैकी ३६१ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. यात मुळशी तालुका हगणदारीमुक्त झाला असून, अद्याप १ हजार ५४ ग्रामपंचायती बाकी असून, १ लाख ३0 हजार कुटुंबीयांकडे शौैचालये नाहीत. ३१ मार्च २0१७ पर्यंत जिल्हा हगणदरीमक्त करण्याचे मोठे काम जिल्हा परिषद प्रशासनाला करावे लागणार आहे.
मात्र लोकप्रतिनिधीच याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील मुळशी तालुका गेल्या वर्षी हगणदरीमुक्त झाला तो फक्त लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पुढाकारामुळेच. लोकप्रतिनिधींनी जर मनावर घेतले तरच ते आपला तालुका, गट, गण निर्मल करू शकतील हे ताजे उदाहरण मुळशीचे आहे.
जिल्हा परिषद सदस्यांच्या गटानुसार माहिती मिळवली असता धक्कादायक माहिती समोर आली. ७0 टक्केपर्यंतचे टार्गेट ७५ पैकी फक्त ५४ सदस्यांच्या गटात पूर्ण झाले असून, २१ गटातील सदस्य हे ७0 पेक्षा खाली आहेत. (प्रतिनिधी)
>इंदापूरच्या एकाही गटात ५0 टक्के काम नाही
यात सर्वांत कमी इंदापूर तालुक्यातील बावडा लाखेवाडी गटातील श्रीमंत ढाले यांचा गट फक्त ३९.८४ टक्के हगणदरीमुक्त झाला आहे. त्यानंतर देवराज जाधव यांचा निमगाव केतकी निमसाखर ४१.६४६, कतुजा पाटील यांचा वडापूर काटी गट ४४.९६५ तर प्रताप पाटील यांचा वालचंदनगर कळस गट ४५.९ टक्केच निर्मल झाला आहे. या सदस्यांना आपला गट ५0 टक्केही निर्मल करता आला नाही.
आंबेगाव ८५.८0, बारामती ७५.८१, भोर ९४.२६, दौंड ६८.३0, हवेली ९0.६९, इंदापूर ४७.६७, जुन्नर ८६.८१, खेड ८१.३२, मावळ ७२,६५, पुरंदर ७७.८९, शिरूर ७६.४३ व वेल्हे ९५.९१ टक्के हगणदरीमुक्त
झाला आहे. भोर आणि वेल्हे लवकरच हगणदरीमुक्त होऊ शकतात.

Web Title: How to become a district free of cost?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.