‘आमदार नाही तर पंकजा मुंडे मंत्री कशा होणार?’, भागवत कराड यांच्याकडून सारवासारव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 09:21 AM2022-09-01T09:21:31+5:302022-09-01T09:22:15+5:30
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत, त्या आमदार नसल्याने मंत्री होण्यास अपात्रच होत्या अशी त्यांच्या म्हणण्याची सारवासारव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे.
नाशिक : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत, त्या आमदार नसल्याने मंत्री होण्यास अपात्रच होत्या अशी त्यांच्या म्हणण्याची सारवासारव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. त्यांची आपली दिल्लीत भेट झाल्याचा दाखलाही कराड यांंनी दिला आहे. अखिल भारतीय महानुभव पंथीयांच्या संमेलनाच्या समारोपासाठी डॉ. कराड नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचा इन्कार केला.
महागाई वाढली असल्याचे मान्य करतानाच डॉ. कराड यांनी चीन आणि अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशात महागाई कमी असल्याचा दावा केला. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि केवळ सुटे साहित्य विक्रीवर जीएसटी नसल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने आपल्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत केवळ केंद्र शासनाकडे बोट दाखवण्यापलीकडे काहीच केले नाही. केवळ ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हेच धोरण होते असे ते म्हणाले.