जयकुमार रावलांचा पत्ता कट करण्याचा खटाटोप?

By admin | Published: July 6, 2016 11:54 PM2016-07-06T23:54:09+5:302016-07-06T23:54:09+5:30

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात आमदार जयकुमार रावल यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी बुधवारी एका तरुणाने रावेरचे आमदार हरीभाऊ जावळे यांना रावल यांच्या विरोधातील कागदपत्रे

How to cut the address of Jayakumar Rauwala? | जयकुमार रावलांचा पत्ता कट करण्याचा खटाटोप?

जयकुमार रावलांचा पत्ता कट करण्याचा खटाटोप?

Next

तोतया कार्यकर्त्याचा कारनामा : आमदार जावळेंना देऊ केली कागदपत्रे

दोंडाईचा जि.धुळे : राज्य मंत्रीमंडळ विस्तारात आमदार जयकुमार रावल यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी बुधवारी एका तरुणाने रावेरचे आमदार हरीभाऊ जावळे यांना रावल यांच्या विरोधातील कागदपत्रे देऊ केली. ही कागदपत्रे पक्षश्रेष्ठींना पाठवा म्हणजे त्याचा मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचा पत्ता कट होईल असा दावाही त्याने केला मात्र अधिक चौकशी करता त्या तरुणाने कोणतीही ओळख न देता आमदार जावळे यांच्याकडून पोबारा केला. यामुळे तो तरुण कार्यकर्ता कोण याची दोंडाईच्यात जोरदार चर्चा आहे.
आमदार जावळे यांनी स्वत: बुधवारी दूरध्वनीवरुन आमदार रावल यांना ही माहिती कळविल्याने हा प्रकार उघड झाला. दरम्यान, ‘लोकमत’ने संपर्क साधला असता या तरुणाने आपल्याशी मंगळवारी दूरध्वनीवरुन संपर्क साधला होता अशी माहिती दिली.
राज्य मंत्रीमंडळाचा ९ जुलैला विस्तार होणार आहे. त्यात शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून बऱ्याच मंडळींनी आटापीटा चालविला आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे.
या घटनेसंदर्भात रावळ गटाने पत्रकान्वये दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने जावळे यांना मी भाजपा कार्यकर्ता असून आमदार रावल यांच्यापेक्षा तुम्हालाच मंत्रीपद मिळायला हवे. आमदार रावल यांच्या विरोधातील ही कागदपत्रे घ्या आणि तुम्ही पक्षश्रेष्ठींना पाठवा म्हणून त्यांचा पत्ता कट होईल असे सांगितले. आमदार जावळे यांनी त्याचा पूर्ण परिचय आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो तरुण गायब झाला.
जिल्ह्यातील राजकारण केवढया खालच्या स्तरापर्यंत पोहचले आहे, हे घटनेवरुन दिसून येते, असे आमदार रावल यांच्यातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दोंडाईचा येथे रावल आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख विरोधी गट आहेत. गेल्या आठवडयात डॉ.देशमुख यांनी आमदार रावल यांना मंत्रीपद दिले तर आंदोलन करु असा इशारा एका पत्रपरिषदेत दिला होता.तर दुसरीकडे , डॉ.देशमुख हे रावल परिवाराला सातत्याने खोटया गुन्ह्यामध्ये अडविण्याचा प्रयत्न करीत असतात असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.

संबंधित इसमाची व माझी भेट झालेली नाही. त्याने फोनवरुन संपर्क साधला. आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांविषयी अनेकांजवळ माहिती दिल्याचे त्याने सांगितले. रावळ बँकेसंदर्भातील कागदपत्रे माझ्याकडे देण्याचा उद्देश काय? असे विचारताच त्याने फोन बंद केला...
- हरिभाऊ जावळे, आमदार

Web Title: How to cut the address of Jayakumar Rauwala?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.