शरद पवारांनी 'जावई' कसा शोधला?; बाळासाहेब ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:47 AM2024-07-27T11:47:31+5:302024-07-27T11:49:17+5:30

शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक प्रसंगावर भाष्य करत दिलखुलास आठवणींना उजाळा दिला. 

How did Sharad Pawar find 'son-in-law'?; Balasaheb Thackeray role became important in Supriya Sule Marriage | शरद पवारांनी 'जावई' कसा शोधला?; बाळासाहेब ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरली

शरद पवारांनी 'जावई' कसा शोधला?; बाळासाहेब ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरली

मुंबई - माझ्या लग्नात बाबांचा रोल झीरो होता, त्यापेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे आणि आईने केले असं सांगत सुप्रिया सुळेंनी त्यांच्या लग्नातील प्रसंगावर भाष्य केले. तुम्हाला जावयांकडून काय अपेक्षा होत्या, सुप्रिया सुळेंच्या लग्नाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय भूमिका पार पडली असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या लग्नातील तो प्रसंग सांगितला. 

एबीपी माझाच्या कार्यक्रमात शरद पवार-सुप्रिया सुळेंची विशेष मुलाखत घेतली त्यावेळी शरद पवार म्हणाले की, प्रॅक्टिकली माझा त्यात काही रोल नव्हता. आमच्या जवळच्या काही मित्रांनी सजेक्ट केले मग त्यात बाळासाहेब ठाकरे असतील किंवा माधव आपटे असतील. माधव आपटे हे उद्योजक, या दोन्ही मित्रांनी सजेक्ट केले. त्याचे कारण कदाचित माझ्या जावयाचे वडील आणि ते मित्र होते. मित्रांनी सजेशन केले त्यानंतर हे दोघे भेटले आणि ठरवलं. साधारणत: जवळचे लोक सुचवतील तो जावई असं त्यांनी म्हटलं.

शरद पवार इज व्हेरी ग्यूड ग्रँडफादर...

माझी मुलगी कुठून फिरणार असेल तर माझ्यापेक्षा तिचं लोकेशन त्यांचे आजोबा शरद पवारांना माहिती असते. माझ्या दोन्ही मुलांवर कायम लक्ष असते. रेवतीची फ्लाईट किती वाजता आहे, गाडी पोहचली की नाही, दिल्लीला गेली तर विमानाचा तिकीट दर काय हेदेखील त्यांना माहिती असतं. कधीही आजोबा म्हणून त्यांनी नातवडांवर दबाव आणला नाही. माझी इच्छा आहे म्हणून हे करा असं ते कधीच करत नाही. He is very good GrandFather असं म्हणत सुप्रिया सुळेंनी वडील शरद पवारांचं कौतुक केले.

दरम्यान, जेव्हा पार्लमेंटमध्ये रेकग्निशन मिळतं, नॅशनल लेव्हलला..विशेष कॉन्ट्रिब्युशन असलेल्यांनाच ते मिळतं. जेव्हा ते मिळालं तेव्हा त्यांचं मानसिक समाधान मिळालं असं सांगत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचं कौतुक केले. तर साहेबांचा कमी अन् मोजकं बोलणं हा गुण सगळ्यात जास्त भावतो असं सुप्रिया सुळेंनी सांगितले. त्याशिवाय माझ्या शाळेत कधीही मी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे असं जाणवून दिलं नाही. ते क्रेडिट शाळेला जातं. शाळेत पालकांच्या बैठकीला वडील येणार, कार्यक्रमाला आले तरी मागे बसणार, मुख्यमंत्री आहेत म्हणून पहिल्या रांगेत कुणी बसवलं नाही. आमच्यासाठी शाळेने वेगळं काही केले असं कधीच झालं नाही असंही सुप्रिया सुळेंनी आठवण सांगितले.
 

Web Title: How did Sharad Pawar find 'son-in-law'?; Balasaheb Thackeray role became important in Supriya Sule Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.