टुरिस्ट परमिटवर ओला-उबर धावतात कशा?- हायकोर्ट

By Admin | Published: August 25, 2016 05:59 AM2016-08-25T05:59:55+5:302016-08-25T05:59:55+5:30

राज्य सरकारच्या एकाही नियमाचे पालन न करता, ओला आणि उबरच्या टॅक्सी रस्त्यांवरून धावतात कशा?

How did the tourist permit run over and over? - HiCort | टुरिस्ट परमिटवर ओला-उबर धावतात कशा?- हायकोर्ट

टुरिस्ट परमिटवर ओला-उबर धावतात कशा?- हायकोर्ट

googlenewsNext


मुंबई : राज्य सरकारच्या एकाही नियमाचे पालन न करता, ओला आणि उबरच्या टॅक्सी रस्त्यांवरून धावतात कशा? कोणत्या धोरणांतर्गत त्यांना टुरिस्ट परवान्यावर टॅक्सी चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती
करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे या संदर्भात स्पष्टीकरण मागितले.
ओला, उबरच्या टॅक्सी अन्य टॅक्सीप्रमाणे मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. त्या टुरिस्ट टॅक्सी आहेत. टुरिस्टबरोबरच या टॅक्सी स्थानिक प्रवाशांची ने-आण
करतात. त्याशिवाय या टॅक्सी चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही, तसेच त्यांच्या ठावठिकाण्याचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत नाही, असे असोसिएशनने याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. त्यावर सरकारी वकिलांनी परिवहन विभागाने फ्लीट टॅक्सींसाठी योजना आखली असून, अद्याप या योजनेला सरकारकडून परवानगी मिळालेली नाही, असे खंडपीठाला सांगितले.
‘या टॅक्सी टॅक्सी स्टँडवर थांबत नाहीत, त्यांना परवानगीच नाही. या दोन्ही कंपन्या सरकारच्या नियमांचे पालन करत नाहीत. या कॅब सेवांवर नियंत्रण ठेवायला काही यंत्रणाच अस्तित्वात नाही. हे केव्हापासून
सुरू झाले आहे? तुम्ही केवळ
रस्त्यावर गोंधळ निर्माण करण्यासाठी कारची संख्या वाढवलीत,’ अशा शब्दांत खंडपीठाने राज्य सरकारची खरडपट्टीही काढली.
अशा टॅक्सींना रस्त्यावरून धावण्याची परवानगी कोणत्या धोरणांतर्गत दिली? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.
जर काही योजना आखली असेल, तर या प्रतिज्ञापत्रासह त्या योजनेचीही माहिती द्या, असेही खंडपीठाने म्हटले.
याचिकेनुसार, मोटार वाहन अ‍ॅक्ट अंतर्गत, ज्या वाहन मालकांना सरकार कंत्राट परवाना देते, त्याच लोकांना अशा प्रकारची सुविधा देण्याची मुभा आहे, तसेच या टॅक्सी केवळ परिवहन विभागाने ठरवून दिल्याप्रमाणेच प्रवाशांकडून भाडे आकारू शकतात. या कॅबना पर्यटनाचा विकास करण्यासाठी टुरिस्ट परवाना दिला आहे. त्यामुळे या कॅबचा वापर
टॅक्सी म्हणून केला जाऊ शकत
नाही. (प्रतिनिधी)
>रिक्षा-टॅक्सी युनियनकडून संपाचे हत्यार
ओला, उबेरसह अ‍ॅप बेस्ड कंपन्यांवर निर्बंध लादण्यात यावेत, अशी मागणी करत तीन युनियनकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले आहेत. यामध्ये २९ आॅगस्टपासून बेमुदत संपाची हाक जय भगवान महासंघ या नव्यानेच आलेल्या युनियनकडून देण्यात आली. ३१ आॅगस्ट रोजी मुंबई आॅटोरिक्शा-टॅक्सीमेन्स युनियनने एकदिवसीय संप पुकारला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २९ आॅगस्ट रोजीच्या संपात स्वाभिमान टॅक्सी युनियनही उतरली आहे.
याबाबत महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आणि बेमुदत संप पुकारत असल्याचे सांगितले.
स्वाभिमान टॅक्सी युनियननेही याच दिवशी संपाची हाक दिली आहे. खासगी टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालावी आणि परिवहन विभागाने लवकरच सिटी टॅक्सी योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी असल्याचे युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी स्पष्ट केले. २९ आॅगस्टनंतर त्वरित ३१ आॅगस्ट रोजी मुंबई आॅटोरिक्शा-टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनीही संप पुकारला आहे.

Web Title: How did the tourist permit run over and over? - HiCort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.