नेते या पक्षातून त्या पक्षात आले की कसे बदलतात? सुधीर मुनगंटीवारांनी रेडिओचे उदाहरण सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 05:16 PM2023-04-26T17:16:32+5:302023-04-26T17:16:51+5:30

राष्ट्रवादीचा काही गट भाजपाकडे येणार आहे का या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, येऊ द्या चांगली गोष्ट आहे.

How do leaders change when they come from this party to another party? Sudhir Mungantiwar gave an example of radio... | नेते या पक्षातून त्या पक्षात आले की कसे बदलतात? सुधीर मुनगंटीवारांनी रेडिओचे उदाहरण सांगितले...

नेते या पक्षातून त्या पक्षात आले की कसे बदलतात? सुधीर मुनगंटीवारांनी रेडिओचे उदाहरण सांगितले...

googlenewsNext

राज्यात सध्या सत्तांतर आणि पक्ष प्रवेशावरून जोरदार चर्चा सुरु आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा आहेत. वेळेवेळी पवार काका-पुतण्यांनी याचे खंडण केले आहे. असे असले तरी चर्चा काही थांबायचे नाव घेत नाहीएत. यावर आता भाजपाचे नेते वन आणि सांस्कृतिककार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तांतरावर भाष्य केले आहे. 

चांगल्या कामासाठी जर लोक आपल्यासोबत येत असेल तर असेल लोक सोबत घेतले पाहिजे. येताना फक्त एवढी काळजी घेतली पाहिजे की, अतिशय गंभीर पद्धतीचे आरोप सिद्ध झालेले आहेत, अशा लोकांना पक्षात घेऊ नये. ही माझी व्यक्तिगत आग्रही मागणी आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे संजय राठोड यांना क्लीनचिट दिली होती. आता राठोड हे एकनाथ शिंदेंसोबत आल्याबरोबर म्हणायचे आता तुम्ही त्यांना कसे घेता? तुम्ही क्लीनचिट दिली, तुमचा तुमच्यावर ही विश्वास नाहीये का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. म्हणजे तुम्हीच लोकांना सांगताय का की मी एक खोटारडा माणूस आहे आणि सर्वांना क्लिन चिट देत फिरतोय, असा टोलाही ठाकरेंना लगावला. 

या पक्षातील नेते त्या पक्षात गेल्यावर कसे बदलतात या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी रेडिओचे उदाहरण दिले. सोलापूरमध्ये रेडिओ विकत घेतला तर सोलापूर आकाशवाणीचा आवाज येईल, मुंबईत आला तर मुंबईचा आवाज येईल. तुमच्या पक्षात असताना त्यांचा जो विचार आहे तो आमच्या पक्षात आल्यावर त्या विचारात राष्ट्रवाद देशभक्तीची भावना जन्माला येते, यामुळे माणसं बदलतात, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचा काही गट भाजपाकडे येणार आहे का या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, येऊ द्या चांगली गोष्ट आहे. देशभक्ती से जो खून ना खोले खून नही वो पानी है, ट्रांझिस्टरची भाषा आपोआप बदलते, त्यामुळं चिंता करू नका. जो जो म्हणून विकास आणि प्रगतीसाठी अतिशय प्रामाणिक भूमिकेने सहकार्य करण्याचा विचार करेल त्याच स्वागत आहे, असे सुतोवाच मुनगंटीवार यांनी केले. 
 

Web Title: How do leaders change when they come from this party to another party? Sudhir Mungantiwar gave an example of radio...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.