काळी आई कशी देऊ जी...

By admin | Published: December 19, 2014 12:49 AM2014-12-19T00:49:29+5:302014-12-19T00:49:29+5:30

काळी आईला कसली म्हणून ती आज पावली, पण अधिकारी शेत सोडण्यासाठी दबाव आणत्यात. दोन एकरचा हा पट्टा सोडून काय करू, लेकरानले काय खावू घालू, की कुटुंबासोबत म्या बी आत्महत्या करू,

How to give black moments ... | काळी आई कशी देऊ जी...

काळी आई कशी देऊ जी...

Next

कैफियत : दोन एकर शेतीसाठी आनंदाचा संघर्ष
सुमेध वाघमारे - नागपूर
काळी आईला कसली म्हणून ती आज पावली, पण अधिकारी शेत सोडण्यासाठी दबाव आणत्यात. दोन एकरचा हा पट्टा सोडून काय करू, लेकरानले काय खावू घालू, की कुटुंबासोबत म्या बी आत्महत्या करू, अशी कैफियत आनंदा ताजने या शेतकऱ्याने मांडली.
भूमिहीनांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेने आज गुरुवारी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चात आनंदाही सहभागी झाला होता. वाशीम जिल्हातील आमखेडा येथून तो आला होता. हातात पिवळा झेंडा उंच धरीत तोही पोटतिडकीने नारे देत होता. मायबाप सरकार आपलं मागणं मान्य करून आपली जमीन आपल्या ताब्यत देईल, एवढीच त्याची अपेक्षा होती. आनंदाला बोलत केले असता तो म्हणाला, १९८५ पासून हा दोन एकरचा पट्टा वाहतो. त्यावेळी शेतीत दगड-धोंडे होते. काटेरी झुडूप होते. राबराब राबलो तेव्हा कुठं शेत उभं झालं. आता कुठे हातात पीक येऊ लागलं. पण अधिकारी ही जमीन गायरान असल्याचे सांगून घाबरवतात. पिकवू नको म्हणून दटावतात. काही पोट्टे जाणूनबुजून शेतात शिरतात, भरलं पीक नासवतात. जमीन आपल्या नावान नसल्याने तक्रार तरी कुठं करावी. दुष्काळ, गारपिटीचा एक पैसा मिळत नाही. शेती बुडली म्हणजे ते वर्ष आमच्यासाठी लई कठीण जाते....काय करू जी...दोन पोर आहेत. त्यानले शिकवून मोठं करायच सपन आहे. ते सपनही हे लेकाचे पाहू देत नाही. दोन एकरच्या शेतीत दोन वेळची भाकर मिळत नाही जी. दुसऱ्यांच्या शेतात राबतो, मजुरी करतो म्हणून जमते. पण कुटुंबाला आधार त्या दोन एकर काळ्या आईचाच. शासनाने ही जमीन ताब्यात दिलं तर जमते जी...असे म्हणत रडायला आलेला आनंदाने तोंड फिरवले... हातातील पिवळा झेंडा आणखी उंच धरला...

Web Title: How to give black moments ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.