एका शिक्षकाला दोन नोकºया कशा देणार? शिक्षणमंत्री तावडे यांचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:13 AM2017-10-19T05:13:52+5:302017-10-19T05:14:18+5:30
रात्र शाळेतील एकाही शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकºया करीत होते, त्यापैकी एक नोकरी कायम करण्यात असून जे शिक्षक अर्धनोकरीत होते
मुंबई : रात्र शाळेतील एकाही शिक्षकांना काढलेले नाही. जे शिक्षक दोन नोकºया करीत होते, त्यापैकी एक नोकरी कायम करण्यात असून जे शिक्षक अर्धनोकरीत होते त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. मात्र, आमदार कपिल पाटील दोन नोकरी करणाºया शिक्षकांना कायम ठेवा आणि अर्धनोकरी करणाºया शिक्षकांना घरी पाठवा असा आग्रह धरीत आहेत, हे कसे शक्य आहे, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरून आ. कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांच्या घरावर काळाकंदील लावून आंदोलन केले. त्यावर मंत्री तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, रात्रशाळांच्या शिक्षकांच्या नोकºया टिकाव्यात आणि त्यांना
न्याय मिळावा यासाठी शासनाने चांगली पद्धत आणली. परंतु स्वार्थापोटी आमदार पाटील यांना शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसत आहे.
युनियन बँकेऐवजी शिक्षकांचे पगार मुंबई बँकेतून देण्यात येतात. मात्र आमदार पाटील यांचे कोणाशीतरी लागेबांधे असल्यामुळे ते दुखावले गेले आहेत. शिक्षकांना गणपती आणि दिवाळी सणांवेळी त्यांचा पगार मुंबई बँकेत वेळेत जमा झाला. ज्या शिक्षकांनी मुंबई बँकेत आपले खाते उघडले त्या शिक्षकांचा पगार सणाच्या आधी जमा झाला. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे आ. पाटील स्टंटबाजी करत आहेत, असा आरोप तावडे यांनी केला.