‘नोक-यांमधील टायपिंगची अट कायम कशी?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 04:13 AM2018-01-18T04:13:26+5:302018-01-18T04:13:30+5:30
टायपिंग मशीनची जागा संगणकाने घेतलेली असतानाही शासकीय नोक-यांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्णतेची अट कायम कशी, असा सवाल ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
यवतमाळ : टायपिंग मशीनची जागा संगणकाने घेतलेली असतानाही शासकीय नोक-यांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्णतेची अट कायम कशी, असा सवाल ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
६० टक्के अपंग असलेले प्रदीप बी. बाल्यापली मुंबईच्या राज्य कामगार विमा योजना कार्यालयात (ईएसआयसी) लॅब असिस्टंट पदावर कार्यरत होते. त्यांना एमएस-सीआयटी ही संगणकीय परीक्षा आणि मराठी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. अपंगत्वामुळे टायपिंग मशीनमध्ये हाताची बोटे अडत असल्याने त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करता आली नाही. त्यामुळे लिपिक-टायपिस्ट पदाच्या नोकरीवरून प्रदीप यांना काढून टाकले आणि शिपाई पदावर नियुक्ती देण्याची तयारी दर्शविली.
याविरोधात प्रदीप यांनी अॅड. अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. टायपिंगच्या मुद्यावर ‘मॅट’ने सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.