विषय बदलल्याने वेळापत्रक बनवायचे कसे?

By admin | Published: April 15, 2017 02:01 AM2017-04-15T02:01:26+5:302017-04-15T02:01:26+5:30

इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, इन्फर्मेशन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी (आयसीटी) विषय रद्द करून दुसरा विषय घेण्याय आला

How to make schedule to change topic? | विषय बदलल्याने वेळापत्रक बनवायचे कसे?

विषय बदलल्याने वेळापत्रक बनवायचे कसे?

Next

मुंबई : इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, इन्फर्मेशन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी (आयसीटी) विषय रद्द करून दुसरा विषय घेण्याय आला आहे. तथापि, यासंदर्भात शाळांना कोणतीही माहिती पुरवण्यात आली नसल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक वेळापत्रक कसे बनवायचे? या संभ्रमात आहेत.
शाळांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ठरवण्यात येतो. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पण, नक्की बदल कोणते आहेत, नवीन कोणता विषय घेण्यात आला आहे, याविषयी कोणत्याही स्वरूपाची माहिती शाळांना दिलेली नाही. त्यामुळे शिक्षक परिषदेने मंडळाला पत्र लिहिले आहे.
नवीन वर्षाचे वेळापत्रक तयार करण्यासाठी आता शिक्षकांच्या हातात कमी दिवस उरले आहेत.
२ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होते.
एप्रिल महिन्यात वेळापत्रकच नाही, तर शिक्षकांना विषयांचे वाटपदेखील करायचे असते. एप्रिल महिन्यातच प्रत्येक इयत्तेचे वेळापत्रक स्वतंत्र तयार करायचे असते. इयत्ता सातवी आणि नववीचे वेळापत्रक कसे तयार करायचे, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
शिक्षकांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर नवीन बदल शाळांना कळवावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

...तरच वेळ मिळेल
२० एप्रिलपर्यंत विषय बदलीसंदर्भातील नवीन बदल शाळांना कळविण्यात आल्यास शिक्षकांच्या हातात १० दिवस राहतील आणि त्यांना वेळापत्रकासाठी वेळ मिळेल, असे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Web Title: How to make schedule to change topic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.