विदर्भातील किती सिंचन प्रकल्प पूर्ण झाले?; हायकोर्टाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 03:19 AM2020-02-27T03:19:03+5:302020-02-27T03:19:26+5:30

पाटबंधारे महामंडळाला मागितले उत्तर

How many irrigation projects in Vidarbha were completed Asks High Court | विदर्भातील किती सिंचन प्रकल्प पूर्ण झाले?; हायकोर्टाची विचारणा

विदर्भातील किती सिंचन प्रकल्प पूर्ण झाले?; हायकोर्टाची विचारणा

Next

नागपूर : आतापर्यंत विदर्भातील किती सिंचन प्रकल्प पूर्ण झाले व किती सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहे, अशी विचारणा नागपूर खंडपीठाने बुधवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला केली व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

यासंदर्भात लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चार वर्षांपूर्वी राज्य सरकारने समितीच्याच याचिकेमध्ये विदर्भातील सिंचन प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही न्यायालयाला दिली होती. दरम्यानच्या काळात जनमंच या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यातून सिंचन प्रकल्पांच्या परिस्थितीत समाधानकारक बदल घडलेला नाही हे दिसून आले. १९५३ मध्ये झालेल्या नागपूर करारात विदर्भाला विकासाचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, विदर्भाला खरा वाटा कधीच मिळाला नाही, असे जनमंचच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: How many irrigation projects in Vidarbha were completed Asks High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.