"मराठीत कळत नाय इंग्लिशमध्ये सांगू", म्हणणा-या आर्चीला इंग्रजीत किती मार्क ?

By admin | Published: June 13, 2017 01:31 PM2017-06-13T13:31:25+5:302017-06-13T13:36:11+5:30

सैराट चित्रपटानंतर प्रसिद्धीस आलेली रिंकू राजगुरु दहावीत फर्स्ट क्लास मिळवत उत्तीर्ण झाली आहे.

How many marks in English do you say, "Why should I tell you in English?" | "मराठीत कळत नाय इंग्लिशमध्ये सांगू", म्हणणा-या आर्चीला इंग्रजीत किती मार्क ?

"मराठीत कळत नाय इंग्लिशमध्ये सांगू", म्हणणा-या आर्चीला इंग्रजीत किती मार्क ?

Next
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - सैराट चित्रपटानंतर प्रसिद्धीस आलेली रिंकू राजगुरु दहावीत फर्स्ट क्लास मिळवत उत्तीर्ण झाली आहे. रिंकूला 66.40 टक्के गुण मिळाले आहेत. राज्यभरात दहावीचे विद्यार्थी निकालाची प्रतिक्षा पाहत असताना रिंकूचे चाहते मात्र रिंकू किती गुणांसह उत्तीर्ण होते याची वाट पाहत होते. सोशल मीडियावरही अनेकजण रिंकूच्या निकालाची प्रतिक्षा पाहत असल्याचंही पोस्ट केलं होतं. अखेर रिंकूचा निकाल हाती आला असून चित्रपटाप्रमाणे निकालही फर्स्ट क्लास आला आहे. 
 
मराठीत सांगितलेलं कळत नाय...इंग्लिशमध्ये सांगू ? असा प्रश्न विचारत डायलॉग म्हणणारी रिंकू प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळेच रिंकूला इंग्लिशमध्ये किती मार्क मिळाले असा प्रश्न सगळे विचारत होते. रिंकूची मार्कशीट हाती आली असून इंग्लिशमध्येही ती फर्स्ट क्लासच्या जवळपास पोहोचली आहे, मात्र फर्स्ट क्लास मिळवू शकली नाही. इंग्रजीत रिंकूला 59 मार्क मिळाले आहेत. 
 
रिंकूने इतर विषयातही चांगले मार्क्स मिळवले आहेत. मराठी 83, हिंदी 87, इंग्रजी 59, गणित 48, सायन्स 42, सामाजिकशास्त्र 50 असे मार्क्स रिंकूने मिळवले आहेत. विशेष म्हणजेच दहावीत शिकत असतानाच रिंकूचं कन्नड सैराटचं शुटिंग सुरु होतं. त्यामुळे तिची टक्केवारी कमी होईल असं अनेकांना वाटत होतं. पण रिंकूने फर्स्ट क्लास मिळवला असून सगळीकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे. 
 
१७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत.  कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण मध्ये ९६.१८ टक्के विद्यार्था पास झाले आहेत.  90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका २४ जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले. 
 

Web Title: How many marks in English do you say, "Why should I tell you in English?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.