किती जणांची माफी मागणार आहात?; छगन भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 12:54 PM2023-07-09T12:54:44+5:302023-07-09T12:55:14+5:30

दिलीप वळसे पाटील का गेले? अनेक वर्ष दिल्लीत खासदार असलेले प्रफुल पटेल का गेले? याचा विचार करायला पाहिजे असं भुजबळ म्हणाले.

How many people are you going to apologize to?; Chhagan Bhujbal's counter attack on Sharad Pawar | किती जणांची माफी मागणार आहात?; छगन भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार

किती जणांची माफी मागणार आहात?; छगन भुजबळांचा शरद पवारांवर पलटवार

googlenewsNext

नाशिक – मी चुकलो असं म्हणत शरद पवारांनी माफी मागितली. मात्र मागे एका प्रशासकीय संकुलाच्या उद्धाटनाला शरद पवार म्हणाले होते की, बारामतीनंतर जर कुठल्या मतदारसंघाचा विकास झाला असेल तर तो येवल्याचा आहे. इथल्या लोकांनी मला सतत निवडून दिलं कारण मी इथं विकास केलाय. काम केले. पण शरद पवार याच मतदारसंघात का आले? ओबीसीचा नेता असल्याने शरद पवार इथं आले असावे. शरद पवार किती ठिकाणी माफी मागणार आहात? पुण्यापासून बीडपर्यंत, गोंदियापासून लातूरपर्यंत ५० वेळा माफी मागणार आहे का? असा पलटवार मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केला.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांच्या घरातूनच हे झाले ना. ६१-६२ वर्ष जे सोबत होते ते अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत. ही सगळी मंडळी का गेली? दिलीप वळसे पाटील का गेले? अनेक वर्ष दिल्लीत खासदार असलेले प्रफुल पटेल का गेले? याचा विचार करायला पाहिजे. छगन भुजबळ यांनी हे सगळे घडवून आणले असं पवारांना वाटते. ही चुकीची माहिती आहे. २०१४ मध्येच जर भाजपाने शिवसेनेला सोडले तर आम्ही काँग्रेसला सोडू असं शरद पवारांनी ठरवले होते. त्यानंतर सरकारमध्ये राष्ट्रवादीचा सहभाग होईल असं पवारांनी म्हटलं होते. पहिल्यापासून भाजपासोबतच्या चर्चा प्रफुल पटेल, अजित पवार, शरद पवार हीच मंडळी करत होती असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला.

तसेच जे राष्ट्रवादी काँग्रेसच्याविरोधात भूमिका घेतात ते शरद पवारांच्या स्टेजवर होते. २-३ ज्येष्ठ मंडळी होते त्यांच्या घरातील तरूण मुले माझ्या स्वागतासाठी आली होती. पक्षाविरोधात काम करणारे अनेक मंडळी व्यासपीठावर होती. २००४ ला शरद पवारांनी सांगितले तुम्हाला निवडणुकीत उभे राहावे लागेल. त्याअगोदार मी मुंबईतून दोनदा शिवसेनेच्या तिकिटावर माझगाव येथून निवडून आलो होतो. १९८५ मध्ये मी शिवसेनेचा नेता होतो. काँग्रेस-राष्ट्रवादीत आल्यावर नेता झालो नव्हतो. मुंबई शहरात आमदार, महापौर होतो असंही भुजबळांनी सांगितले.

...मला विनाकारण राजीनामा द्यायला सांगितला

२००३ मध्ये तेलगीला मीच गृहमंत्री असताना अटक केली होती. त्याच्यावर मोक्का लावला. पण मीच काहीतरी केल्याचे आरोप लावला. मला राजीनामा देण्यास साहेबांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने तेलगी प्रकरण सीबीआयकडे सोपवा हे सांगितले. सीबीआयकडे केस गेली. मला आणि समीर भुजबळ यांना एकदा-दोनदा चौकशीला बोलावले. त्यावेळी भाजपा सरकार दिल्लीत होते. सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केले त्यात भुजबळ नाव कुठेही नव्हते. मला विनाकारण राजीनामा द्यायला सांगितला होता असं भुजबळांनी म्हटलं.

येवल्याची निवड मी केली, शरद पवारांनी नाही

मी जुन्नरमधून लढावे असं शरद पवारांनी सांगितले. त्याठिकाणी माझ्या वडिलांचे गाव त्याचसोबत मी भायखळा भाजी मंडईचा अध्यक्ष होतो. तिथली सगळी मंडळी जुन्नरची होती. साहेबांचे पुणे आणि जिल्ह्यावर लक्ष होते. त्यामुळे जुन्नरमधून मी लढावे असे त्यांनी म्हटलं. परंतु येवला विधानसभेची स्थिती ठीक नव्हती. मी स्वत: येवल्याची निवड केली होती. शरद पवारांनी मला येवल्यात पाठवले नव्हते. येवला तालुका दुष्काळग्रस्त होता. त्याठिकाणी दोनदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. परंतु येवलाकरांनी प्रेम दिले आणि संघर्षातून मी ४ वेळा या मतदारसंघातून निवडून दिले असंही प्रत्युत्तर छगन भुजबळांनी दिले.

Web Title: How many people are you going to apologize to?; Chhagan Bhujbal's counter attack on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.