फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:23 PM2021-05-13T12:23:21+5:302021-05-13T12:24:18+5:30

Coronavirus : देशात सध्या तीन कंपन्यांच्या लसीकरणाला परवानगी; देशात आणि मुंबईच्या आसपास फ्रान्सच्या नागरिकांना मॉडर्नाची लस दिली जात असल्याचा मलिक यांचा आरोप

How Moderna vaccines are given to French citizens the central government should disclose Nawab Malik covid 19 | फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक

फ्रान्सच्या नागरिकांना Moderna ची लस कशी दिली जाते, केंद्र सरकारने खुलासा करावा; नवाब मलिक

Next
ठळक मुद्दे देशात सध्या तीन कंपन्यांच्या लसीकरणाला परवानगीशात आणि मुंबईच्या आसपास फ्रान्सच्या नागरिकांना मॉडर्नाची लस दिली जात असल्याचा मलिक यांचा आरोप

"देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस देण्याचे काम कुठल्या पद्धतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

देशात लस तुटवडा असल्याचे केंद्र सरकार सांगतेय. केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सrरम इन्स्ट्यिट्यूट आणि स्पुटनिकला परवानगी दिली आहे. असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला Moderna कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे," आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

"हे लसीकरण विदेशातील दुतावासात आहे. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरीक भारतातमुंबईत आहेत. त्यांना Moderna ची लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दुतावासातील नागरीकांचे भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत आहे," असेही नवाब मलिक म्हणाले. "तीनच कंपन्यांना परवानगी असताना Moderna ची लस कशी काय दिली जातेय," असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

Web Title: How Moderna vaccines are given to French citizens the central government should disclose Nawab Malik covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.