आणखी किती खून? उपराजधानीत तीन खून : नागरिकांमध्ये दहशत

By admin | Published: May 5, 2014 01:34 AM2014-05-05T01:34:21+5:302014-05-05T01:34:21+5:30

मागील काही दिवसांपासून शहरात खुनी सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री एका महिलेचा आणि रविवारी सकाळी दोघांचा पुन्हा खून करण्यात आला.

How much blood? Three murderers in subdivision: terror among citizens | आणखी किती खून? उपराजधानीत तीन खून : नागरिकांमध्ये दहशत

आणखी किती खून? उपराजधानीत तीन खून : नागरिकांमध्ये दहशत

Next

नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात खुनी सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री एका महिलेचा आणि रविवारी सकाळी दोघांचा पुन्हा खून करण्यात आला. त्यामुळे शहरात आणखी किती खून होणार, असा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. सायकल विक्रीच्या क्षुल्लक कारणावरून एका दारुड्या पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यावर कुºहाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली.

ही घटना एमआयडीसी हद्दीतील पंचशीलनगर झोपडपट्टी येथे शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपी दारुड्या पतीला रात्रीच अटक केली. अब्दुल सहीद शेख अब्दुल वहीद शेख (५०) असे आरोपी पतीचे नाव आहे, तर रमिजा शेख (४५) असे मृत पत्नीचे नाव आहे. त्यांना आबीद (१७) आणि साहिल (१४) ही मुले आहेत. आरोपी अब्दुल सहीद हा मूळ बालाघाट येथील डोंगरमाली गावातील रहिवासी आहे. आरोपीला दारूचे व्यसन आहे. गावातील वडिलोपार्जित संपत्तीसाठी त्याने आपल्या आई-वडिलांवरही हल्ला केला होता. तेव्हापासून त्याचा आपल्या इतर भावांबरोबर संपत्तीवरून न्यायालयात वाद सुरू आहे. त्याच्याजवळ कमाईचे कुठलेही साधन नाही. संपत्तीच्या वादासंबंधात त्याला अनेकदा गावाला जावे लागत होते. त्यामुळेसुद्धा त्याची आर्थिक परिस्थिती आणखी बिघडली होती, वरून त्याला दारूचे व्यसन होते. तीन वर्षांपूर्वी तो आपल्या साळीच्या घराजवळ एमआयडीसी पंचशीलनगर झोपडपट्टीत कुटुंबासह राहायला आला होता.

सूत्रानुसार शनिवारी त्याने आपली जुनी सायकल विकली. यावरून त्याचे पत्नी रमिजासोबत भांडण झाले. रात्री ९ वाजता त्याने पत्नी व मुलांसोबत जेवण केले. रमिजाच्या मोठ्या बहिणीचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे रमिजा आणि तिची लहान बहीण हलिमा सय्यद लहान मुलगा साहिल हे मोठ्या बहिणीच्या घरी आले होते. रात्री सर्वजण अंगणात खाट टाकून झोपले होते. या दरम्यान आरोपी अब्दुल कुºहाड घेऊन पोहोचला. यावेळी रमिजा आपल्या लहान मुलासह खाटेवर झोपली होती. अब्दुलने झोपलेल्या रमिजाच्या डोक्यावर कुºहाडीने प्रहार केले. यात ती जागीच ठार झाली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. कचरा वेचणाºयाला दगडाने ठेचले सेंट्रल एव्हेन्यूस्थित भावसार चौकात शनिवारी मध्यरात्री कचरा वेचणाºया एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पोलीस सूत्रानुसार मृत युवकाची ओळख पटू शकलेली नाही. त्याचे वय अंदाजे २५ वर्षांचे असून त्याच्या हातावर नीलेश असे गोंदलेले आहे. नीलेश नेहमीच भावसार मंगल कार्यालयाजवळील सावजी ट्रेडर्सच्या ओट्यावर झोपत होता. तो दिवसभर इतर साथीदारासोबत कचरा वेचत होता.

रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना नीलेशचा मृतदेह आढळून आला. त्याचे डोके सिमेंटच्या दगडाने ठेचलेले होते. पोलिसांना माहिती देण्यात आली. सूत्रानुसार सकाळी ७ च्या पूर्वी किंवा मध्यरात्री कुणासोबत वाद होऊन त्याची हत्या करण्यात आल्याचे दिसून येते. पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृताच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. तिसºया साथीदाराचा शोध सुरू आहे. प्रॉपर्टी डीलरने घरी बोलावून केला खून अजनी हावरापेठ येथील एका प्रॉपर्टी डिलरने पैशाच्या देवाणघेवाणीतून एका व्यक्तीला आपल्या घरी बोलावून त्याचा खून केला. अशोक ऊर्फ गोविंदा सोमाजी सोनवणे (४०) असे मृताचे नाव आहे. मृत मूळचा तुमसरचा राहणारा आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो अयोध्यानगर येथे राहणाºया आपल्या बहिणीच्या शोभा विजय सहारे यांच्या घरी राहत होता. या घटनेनंतर आरोपी प्रॉपर्टी डीलर सत्येंद्र नर्मदाप्रसाद सिन्हा (४३) हा फरार झाला. सूत्रानुसार मृत अशोक आणि त्याचा मित्र बाबा भगत यांनी आरोपीला एक प्लॉट खरेदीसाठी १६ लाख ५० हजार रुपये दिले होते. परंतु आरोपी सत्येंद्र त्यांना प्लॉटचे दस्ताऐवज देत नव्हता. सत्येंंद्र नेहमी टाळाटाळ करीत असल्याने अशोक आणि बाबा आपले पैसे परत मागू लागले. परंतु तो पैसे देण्यासही टाळू लागला. रविवारी सकाळी ८.३० वाजता सत्येंद्रने अशोकला पैसे घेण्यासाठी आपल्या हावरापेठ येथील घरी बोलाविले. त्यांच्यात वाद झाला. तेव्हा आरोपीने एका अवजड वस्तूने अशोकच्या डोक्यावर प्रहार केला. यात त्याचा मृत्यू झाला. मृताची बहीण शोभा सहारे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: How much blood? Three murderers in subdivision: terror among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.