कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? याचा भाजपाने विचार करावा - उद्धव ठाकरे
By Admin | Published: April 24, 2016 06:52 PM2016-04-24T18:52:27+5:302016-04-24T18:52:27+5:30
कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला
ऑनलाइन लोकमत
नाशिक. दि. २४ - कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक येथील कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला.
भविष्यात युती करायची की नाही, हे शिवसेनाच ठरवेल, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भाजपवर जोरदार टीका केली. तसेच, सत्तेसाठी नव्हे, हिंदुत्वासाठी युती केल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, ह्लभाजपला उत्तर देण्यासाठी मेळावा घेतला आहे का?ह्व तर यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ह्लछोट्या गोष्टींसाठी वाघांना बोलवण्याची गरज नाही.ह्व अशाप्रकारे उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधला. ह्लमी सरकारच्या विरोधात नाही, जनतेच्या मनातलं बोलतोह्व असे सांगायलाही उद्धव विसरले नाहीत.
तमाम महाराष्ट्र तेव्हाच शिवसेनेच्या मागे उभा राहिला असता, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी खात्री उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्तवाद आम्हाला मान्य असून, त्यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणीही उद्धव यांनी यावेळी केली
ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
> शिवसेनेला रस्त्यावर उतरायला लागते, कारण केंद्र सरकारवर टीका होते. उत्तराखंड प्रकरणातही अशीच टीका झाली. मित्र म्हणून मित्राला सावध करणे आमचे काम आहे.
> युती आहे काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही. युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर होती. परंतु तोही मुद्दा मागे पडला आहे. हिंदुत्त्वाचा मुद्दा मागे पडला तर भाजपसोबत युती करणार नाही, भविष्यात युती करायची की नाही, हे कार्यकर्ते ठरवतील.
> तहानलेल्या लोकांना जर पाणी दिले नाही तर सत्ता काय कामाची? म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मित्राला सावध केले.
> दुष्काळावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे
> कन्हैयाचा जन्म कसा झाला? याचा विचार कारावा. युवकांना देशद्रोह ठरवल्यावर युवकांनी काम कसे करावे?
> लहान राज्ये कशासाठी? राष्ट्रपती राजवट लागू करायला?
> नाशिक मेळाव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे होणार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार.