शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार? डॉ. रघुनाथ माशेलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 08:45 PM2020-12-25T20:45:10+5:302020-12-25T20:50:46+5:30

केवळ शिक्षक दिन किंवा गुरुपौर्णिमा साजरी करून चालणार नाही.

How will the country fare if the teacher does not get prestige? Dr. Raghunath Mashelkar | शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार? डॉ. रघुनाथ माशेलकर

शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार? डॉ. रघुनाथ माशेलकर

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'अटल संस्कृती गौरव' पुरस्कार

पुणे : अटलजींना शिक्षकांविषयी कमालीची आत्मीयता होती. शिक्षकांना समाजात पूर्वीसारखी प्रतिष्ठा मिळायला हवी, असे त्यांना नेहमी वाटायचे. सध्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अमंलबजावणीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीचा मी अध्यक्ष आहे. त्यामध्ये शिक्षकांना प्रतिष्ठा देण्यावर भर देण्यात येणार आहे. केवळ शिक्षक दिन किंवा गुरुपौर्णिमा साजरी करून चालणार नाही. शिक्षकाला प्रतिष्ठा मिळाली नाही तर देश कसा घडणार, असा प्रश्न ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थित केला. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील गुंतवणूक वाढण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’ या वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, सिद्धार्थ शिरोळे, गायिका गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, वैशाली माशेलकर, संवाद, पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते. माशेलकर म्हणाले, 'राष्ट्रपुरुष आणि युगपुरुष असलेल्या अटलजींच्या नावाचा 'अटल संस्कृती गौरव' हा माझ्या आयुष्यातील सर्वोचच पुरस्कार आहे. सीएसआरला लौकिक मिळण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. परिवर्तन करताना कठीण निर्णय घ्यावे लागतात आणि त्याला राजकीय पाठिंबा लागतो. अटलजींनी केवळ पाठिंबाच नाही, तर संपूर्ण स्वातंत्र्य दिले.

 

आजपर्यंत १७ माशेलकर समित्या स्थापन झाल्या. सरकार अडचणीत असते, तेव्हा माशेलकर समिती स्थापन करते, असे अटलजी म्हणाले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानावर त्यांची श्रद्धा होती. पुण्यातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी 'जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान' अशी घोषणा केली. पोखरण येथील अणूचाचणीनंतर जगामध्ये भारताची प्रतिमा पूर्णपणे बदलली. तेथे भारताला खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानातील स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याचे श्रेय अटलजींना जाते. ११ मे हा तंत्रज्ञान दिवस असल्याचा निर्णयजी त्यांचाच होता.'

मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले. सुनील महाजन यांनी आभार मानले. 

-------------------

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संवाद, पुणेची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींच्या रचना सादर केल्या. अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नृत्य सादर केले.

Web Title: How will the country fare if the teacher does not get prestige? Dr. Raghunath Mashelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.