विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:36 PM2024-10-25T16:36:52+5:302024-10-25T16:37:25+5:30
लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत.
मशाल विरुद्ध धनुष्यबान हा लोकसभेत जिंकलेला आहे. लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेत एवढी सर्व फेका-फेक करून फेक नरेटिव्ह करूनही धनुष्यबान त्यांच्यावर भारी पडला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
आपण मुख्य नेते म्हणून उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहात, या विधानसभेचा स्ट्राइकरेट कसा असेल असे वाटते? यावर बोलताना शिंदे म्हणाले, "मी सांगितले तुम्हाला की, स्ट्राइकरेट जो आहे, लोकसभेत एवढे सर्व फेक नेरेटिव्ह पसरवूनसुद्धा, लोकांना फसवूनही आमचा स्ट्राइकरेट उबाठा पेक्षा अधिक होता. तसेच महायुतीचा स्ट्राइकरेट जो आहे, तो या निवडणुकीत कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राइकरेट एकदम सर्वात भारी असेल आणि सर्वांना चारीमुंड्या चीत करेल. आमचे लोक या निवडणुकीत चौराक आणि षटकार मारतील
लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे -
आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याच वेळी त्यांनी (महाविकास आघाडी) खोडा घातला. ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली, हाकलवून लावले. यानंतर ते नागपूरच्या न्यायालयात गेले. काँग्रेसचे वडपल्लीवार गेले आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे आणि पोटात खुपती आहे. त्यांनी सगळं सांगितलं आहे की, ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या बंद पाडू, चौकशी करू. म्हणून त्यांना जनता साथ देणार नाही. त्यांचे सरकारच येणार नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही. लाडक्या बहिणींनी ठरवले आहे की, या लाडक्या भावांना पुन्हा या सरकारमध्ये आणायचे आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.