...तरी पाण्याचे टेन्शन कायम

By admin | Published: June 29, 2016 01:45 AM2016-06-29T01:45:58+5:302016-06-29T01:45:58+5:30

मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावली खरी़ मात्र, अद्यापही त्याने पुरेसा जोर धरलेला नाही.

However, the water tension continued | ...तरी पाण्याचे टेन्शन कायम

...तरी पाण्याचे टेन्शन कायम

Next


मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावली खरी़ मात्र, अद्यापही त्याने पुरेसा जोर धरलेला नाही. गेल्या चार दिवसांतील या रिमझिम सरींमुळे जलसाठा ११ हजार दशलक्ष लीटरने वाढला आहे़ मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा साठा दोन लाख ४० हजार दशलक्ष लीटरने कमी आहे़ त्यामुळे पाण्याचे टेन्शन अद्यापही मुंबईकरांवर कायम आहे़
जून महिन्यातील मुहूर्त चुकवत आलेल्या मान्सूनने तलाव क्षेत्रांकडे मात्र पाठ फिरवली. मुंबईत सखल भाग पाण्याखाली जात असताना तलाव क्षेत्र मात्र कोरडेच आहे,परंतु गेल्या चार दिवसांत रिमझिम सरी तलावांमध्ये कोसळल्या. मोडक सागर आणि तानसा तलावात पावसाने हजेरी लावली आहे, तर मुंबईस्थित विहार आणि तुळशी तलावाची पातळी दररोज वाढत आहे़, परंतु एकूण आवश्यकतेच्या तुलनेत १० टक्के जलसाठाही तलावांमध्ये जमा झालेला नाही़
गेल्या वर्षी अपुरा पाऊस पडल्यामुळे तलावात समाधानकारक जलसाठा जमा झाला नाही़ तरीही जून अखेरीपर्यंत तलावांमध्ये एकूण तीन लाख ४० हजार दशलक्ष लीटर म्हणजेच, आवश्यक जलसाठ्याच्या २५ टक्के जलसाठा होता़, परंतु या वर्षी जूनच्या अखेरीस जेमतेम एक लाख तीन हजार दशलक्ष लीटर जलसाठा तलावांमध्ये आहे़ (प्रतिनिधी)
>मुंबईत सरीवर सरी
मुंबई उपनगरांत पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम होता. २७ जूनला सकाळी ८ ते २८ जून सकाळी ८ या २४ तासांत कुलाबा परिसरात १०.२ मिलीमीटर, तर सांताक्रुझमध्ये ७९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मुंबई उपनगरांत पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम होता. २७ जूनला सकाळी ८ ते २८ जून सकाळी ८ या २४ तासांत कुलाबा परिसरात १०.२ मिलीमीटर, तर सांताक्रुझमध्ये ७९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पावसामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.

Web Title: However, the water tension continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.