हावडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच
By Admin | Published: January 23, 2015 01:52 AM2015-01-23T01:52:54+5:302015-01-23T01:52:54+5:30
नागरिकांनी रेलरोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक दिवसभर विस्कळीत होती. तीन रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
नागपूर : हावडा-मुंबई मार्गावरील पानपोस-कलुंगा रेल्वेस्थानकादरम्यान स्थानिक समस्यांसाठी नागरिकांनी रेलरोको आंदोलन केल्यामुळे वाहतूक दिवसभर विस्कळीत होती. तीन रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
रेल रोको आंदोलनामुळे विविध गाड्या तीन तास ते २२ तास उशिराने धावत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुम फुल्ल झाल्याची स्थिती आहे. याशिवाय १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस आणि १२२६१ मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली.