हावडा ते नागपूर प्रवासाचे तिकीट

By admin | Published: September 22, 2014 12:54 AM2014-09-22T00:54:22+5:302014-09-22T00:54:22+5:30

बॅगची तपासणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना ४ नोटांचे बंडल आढळले. यात एका बंडलात १ हजाराच्या १४९ नोटा म्हणजे १ लाख ४९ हजार रुपये होते. दुसऱ्या बंडलमध्ये वरच्या बाजूला १ हजाराची

Howrah to Nagpur journey ticket | हावडा ते नागपूर प्रवासाचे तिकीट

हावडा ते नागपूर प्रवासाचे तिकीट

Next

नागपूर : बॅगची तपासणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत त्यांना ४ नोटांचे बंडल आढळले. यात एका बंडलात १ हजाराच्या १४९ नोटा म्हणजे १ लाख ४९ हजार रुपये होते. दुसऱ्या बंडलमध्ये वरच्या बाजूला १ हजाराची नोट आणि खाली नोटाच्या आकाराची पेपरची रद्दी आणि झेरॉक्सचे नोटाच्या आकाराचे कोरे कागद होते. दुसऱ्या बंडलमध्ये वर ५०० ची नोट आणि खाली नोटाच्या आकाराचे कोरे कागद, तिसऱ्या बंडलमध्ये वर १ हजाराची नकली नोट, खाली ५०० रुपयाची नकली नोट आणि मध्ये नोटाच्या आकाराचे कोरे कागद होते.
दरम्यान आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी अमजद खान जवळ ६३ हजार रुपये रोख, निर्मल ते नागपूर बस प्रवासाचे तिकीट, समीरनजवळ १ हजार ५०० रुपये, हावडा ते नागपूर प्रवासाचे जनरल तिकीट आणि दोन मोबाईल आढळले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी पुरुषोत्तम बाडीवाले, गोपाल यादव, एलसीबीचे निरीक्षक रमेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार वानखेडे, उपनिरीक्षक आनंद मेश्राम, नरेंद्र चौधरी, विजय तायवाडे, गौतम शिरसाठ, विराज मते, जितेंद्र लोखंडे, भूपेश धोंगडी यांनी पार पाडली.(प्रतिनिधी)
आॅटो विकून आणले पैसे
प्रकरणात अटक करण्यात आलेला निर्मल आंध्रप्रदेश येथील आरोपी अमजद खान याची ओळख आरोपी समीरन आणि त्याच्या मित्राशी मोबाईलवर झाली. असली नोटा घेऊन नकली नोटा घेण्याचा त्यांचा मोबाईलवर व्यवहार झाला. त्यानंतर आदिलाबादला भेटून नागपूरला येण्याचा बेत त्यांनी आखला. ठरल्याप्रमाणे अमजदने आपला आॅटो विकून त्यातून आलेले ६३ हजार रुपये घेऊन आला होता. त्या मोबदल्यात ६ लाखाच्या नकली नोटा नेऊन त्या चलनात आणायच्या असा त्याचा बेत होता. परंतु त्यापूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Web Title: Howrah to Nagpur journey ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.