बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Published: May 26, 2016 06:36 PM2016-05-26T18:36:18+5:302016-05-26T18:36:18+5:30

बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बिबी येथे 26 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली

Hrithik's suicide | बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत

बुलढाणा, दि. 26- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बिबी येथे 26 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
लोणार तालुक्यातील बिबी येथे शिक्षक कॉलनीत राहणारे प्रताप चव्हाण यांची मुलगी सुश्मीता चव्हाण ही बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. 25 मे रोजी बारावीचा आॅनलाईन निकाल घोषित झाला. त्यामध्ये सुश्मीताला 54 टक्के गुण मिळाले. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ही विद्यार्थिनी दुपारपासून नाराज होती.गुणाची टक्केवारी कमी आल्याने नैराश्यापोटी रात्रीचे वेळी सुश्मीता प्रताप चव्हाण हिने लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार सकाळच्या सुमारास लक्षात आला. अनिल दत्तू राठोड यांच्या तक्रारीवरुन बिबी पोलीस स्टेशनला जाफो कलम 174 नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिबी पोलीस करीत आहेत.

Web Title: Hrithik's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.