परीक्षार्थींनो, काळजी करू नका; आम्ही सांगतो तेवढं करा, सगळं ठीक होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:08 AM2022-03-04T06:08:23+5:302022-03-04T06:09:07+5:30

‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही.

hsc examination started from today do not worry do as we say everything will be fine | परीक्षार्थींनो, काळजी करू नका; आम्ही सांगतो तेवढं करा, सगळं ठीक होईल

परीक्षार्थींनो, काळजी करू नका; आम्ही सांगतो तेवढं करा, सगळं ठीक होईल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई/पुणे :  ‘कोरोना’ महामारीमुळे दोन वर्षे ऑफलाईन परीक्षा होऊ शकली नाही. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ‘कोरोना’सारखे आव्हान परतवून लावल्यावर आता आणखी कसली भीती? आता कोणतीही परीक्षा असली तरी आपण मार्ग काढू शकतो. तेव्हा, चिंता करायची नाही. मस्त पेपर द्यायचे!

राज्यातून एकूण १४,७२,५७४ विद्यार्थ्यांनी तर मुंबईतून ३ लाख ३५ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्य मंडळाच्या माहितीनुसार, मुंबईत ५०५ मुख्य केंद्रे तर ७७७ उपकेंद्रांचे परीक्षा केंद्र म्हणून नियोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागात एकूण ६७ परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन मुंबई विभागीय मंडळाकडून करण्यात आले आहे. 

समुपदेशन सेवा परीक्षा काळातही कार्यरत राहणार 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे वर्षभरानंतर प्रथमच राज्यभरात इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रचलित पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा देणार आहेत.

या पेपरच्या वेळात बदल 

राज्य मंडळाने काही विषयांच्या पेपरच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यासंबंधी यापूर्वीच सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात आले आहे. ५ आणि ७ मार्च या दिवशी होणाऱ्या परीक्षा ५ आणि ७ एप्रिल रोजी होणार आहेत.

अडचण आल्यास समुपदेशन उपलब्ध 

एससीईआरटी आणि मुंबई विभागीय मंडळाकडून प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण आल्यास किंवा शंका निरसनासाठी विद्यार्थी या समुपदेशकांना संपर्क करू शकणार आहेत. मुंबईत ३५, पूर्व मुंबईत १, उत्तर मुंबईत ११, दक्षिण मुंबईत ९, मुंबई उपनगरात १७ तर पश्चिम मुंबईत १५ समुपदेशकांची नोंदणी करण्यात आली आहे.  प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षाकाळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

शाखानिहाय मुंबईतील विद्यार्थीसंख्या 

विज्ञान - ९९०९४
कला - ५०८४५
वाणिज्य - १८०४९५
व्होकेशनल - ४४७८
आयटीआय - १०८

मुंबई विभागातील जिल्हानिहाय परीक्षा केंद्रे

केंद्र - उपकेंद्र - परिरक्षक 

ठाणे -  १५८- २५२- १३ 
पालघर -५३- १५५- ११ 
रायगड- ४६- १४४- १५ 
मुंबई (दक्षिण )- ६४- ५६ - ७

मुंबई (पश्चिम)- १०८ -८८- १३ 
मुंबई (उत्तर)- ७६- ८२ - ८

एकूण- ५०५-७७७- ६७

परीक्षार्थींनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. काळजी करण्याचे काही कारण नाही. पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये. मुलांना मानसिक आधार द्यावा. - वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

Web Title: hsc examination started from today do not worry do as we say everything will be fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.