बारावीची फेरपरीक्षा जुलैमध्येच!
By Admin | Published: February 2, 2016 04:04 AM2016-02-02T04:04:35+5:302016-02-02T04:04:35+5:30
दहावीप्रमाणेच आता बारावीची फेरपरीक्षाही सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे
मुंबई : दहावीप्रमाणेच आता बारावीची फेरपरीक्षाही सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी गतवर्षीपासून दहावीची फेरपरीक्षा जुलैमध्येच घेण्याचा निर्णय झाला. नियमित परीक्षेत नापास झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना तातडीने फेरपरीक्षेची संधी मिळाल्याने त्यांचेही शैक्षणिक वर्ष वाचू शकेल. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होता येईल, हा यामागील उद्देश असल्याचे तावडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी १०वीत नापास झालेल्यांची २१ जुलै ते ५ आॅगस्ट २०१५ या कालावधीत फेरपरीक्षा होऊन त्याचा निकाल २५ आॅगस्टला जाहीर झाला होता. फेरपरीक्षेमध्ये ५७,५१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि ते ११वीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले. त्यांचे वर्ष वाचले. (प्रतिनिधी)