दहापैकी १ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये! बारावीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 06:14 AM2023-05-26T06:14:05+5:302023-05-26T06:14:23+5:30

९१.२५% लागला राज्याचा निकाल; गतवर्षीच्या तुलनेत घट कोकण विभाग अव्वल, विज्ञान शाखा सरस

HSC Result Maharashtra Board: 1 in 10 students in Distinction! In the result of 12th, again only girls win | दहापैकी १ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये! बारावीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी

दहापैकी १ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये! बारावीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला असून १० पैकी एका विद्यार्थ्याने डिस्टिंक्शन मिळवल्याचे निकालातून दिसून आले आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का २.९७ टक्के घसरला आहे. 

विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे याहीवर्षी मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निकालामध्ये कोकण विभाग टॉपवर आहे. मुंबईने निकालात तळ गाठला आहे. यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के, तर इतर शाखांचा निकाल कमी लागला आहे. त्यात कला शाखा ८४.०५, वाणिज्य ९०.४२, व्यवसाय अभ्यासक्रम ८९.२५ टक्के आहे.     

ओव्हर रायटिंग वगळून विद्यार्थ्यांना मिळणार गुण
औरंगाबाद विभागीय मंडळात भाैतिकशास्त्राच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये ओव्हर रायटिंग झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ओव्हर रायटिंगचा मजकूर वगळता सर्वांना गुण दिले आहेत, तसेच त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासह इंग्रजी विषयात चुकीचा प्रश्न नाेंदवून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना गुण दिले असल्याचेही ते म्हणाले.

विभागनिहाय निकाल 
    विद्यार्थी    उत्तीर्ण     टक्केवारी
कोकण    २६,१२३    २४,९९०    ९६.०१ 
पुणे    २,४२,७३४    २,२४,६६५    ९३.३४ 
कोल्हापूर    १,१८,७९१    १,१०,११०    ९३.२८ 
अमरावती    १,३९,७६९    १,२८,५२१    ९२.७५ 
औरंगाबाद    १,६६,५५१    १,५१,१४८    ९१.८५ 
नाशिक    १,५९,९८७    १,४५,७४९    ९१.६६ 
लातूर    ८९,७८२    ७९,५७२    ९०.३७
नागपूर    १,५३,२९६    १,३७,४५५    ९०.३५ 
मुंबई    ३,३१,१६१    २,९०,२५८    ८८.१३ 

मुलींचाच डंका 

n राज्यात ७ लाख ६७ हजार ३८६ मुलांनी बारावीची परीक्षा दिली. 
n त्यापैकी ६ लाख ८४ हजार ११८ उत्तीर्ण झाले, तर ६ लाख ४८ हजार ९८५ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख ८ हजार ३५० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

पुनर्परीक्षेत काय झाले?
राज्यात ३५,५८३ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली हाेती. त्यातील १५,७७५ उत्तीर्ण झाले. 

साडेपाच हजार दिव्यांगांचे यश
९ विभागांतील विविध शाखांमधून ६ हजार ७२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी ५,६७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

Web Title: HSC Result Maharashtra Board: 1 in 10 students in Distinction! In the result of 12th, again only girls win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.