दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
By अविनाश साबापुरे | Published: May 28, 2024 05:50 AM2024-05-28T05:50:12+5:302024-05-28T05:51:03+5:30
दहा वर्षांत या मुलींच्या शिक्षणाचे काय झाले? कारणे शोधण्याचे शिक्षण व्यवस्थेपुढे आव्हान
अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली, परंतु दहा वर्षांपूर्वी पहिल्या वर्गात दाखल झालेल्या जवळपास दोन लाख मुली यंदा दहावीच्या परीक्षेपर्यंत पोहोचूच शकलेल्या नाहीत. दहा वर्षांत त्यांच्या शिक्षणाचे काय झाले, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान आहे.
बोलकी आकडेवारी
- ९,५४,२६० : २०१४ मध्ये पहिल्या वर्गातील मुली
- ७,७४,०८६ : २०२४ मध्ये दहावीला बसलेल्या
- ७,२८,०५९ : राज्य मंडळाची परीक्षा देणाऱ्या
- ४६,०२७ : सीबीएसईची परीक्षा देणाऱ्या
- १,८०,१७४ : दहावीपूर्वी मुली गळाल्या
दहावीचाही निकाल वाढला; ९५.८१% विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे : मार्च-२०२४ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बारावीप्रमाणे यंदा दहावीचाही निकाल वधारला आहे. राज्याचा निकाल ९५.८१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत १.९८% निकाल वाढला आहे.
विभागनिहाय निकाल
- कोकण ९९.०१%
- कोल्हापूर ९७.४५%
- पुणे ९६.४४%
- मुंबई ९५.८३%
- अमरावती ९५.५८%
- नाशिक ९५.२८%
- लातूर ९५.२७%
- छ. संभाजीनगर ९५.१९%
- नागपूर ९४.७३%