बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी
By admin | Published: May 30, 2017 11:12 AM2017-05-30T11:12:07+5:302017-05-30T11:51:01+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा यंदाचा बारावीचा निकाल ८९.५० टक्के लागला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१७मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला
यंदा राज्याच्या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८९.५० इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.९० टक्क्यांनी वाढ झाली. मुलींनी निकालात सरशी कायम राखली आहे. कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबई विभाग शेवटच्या क्रमांकावर आहे. पुणे विभागाचा निकाल ९१.१६ टक्के लागला आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची घोषणा राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. बारावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी (दि.30) जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना येत्या ९ जून रोजी दुपारी 3 वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात मुळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे.
गेल्या वर्षी राज्याचा बारावीचा निकाल ८६.६० टक्के लागला होता. यावर्षी ८९.५० टक्के निकाल लागल्याने राज्याच्या निकालात २.९० टक्के वाढ झाली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.२० टक्के तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.२१ टक्के लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. यंदा मुलींची निकाल ९३.०५ टक्के तर मुलांची निकाल ८६.६५ टक्के लागला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे
पुर्नपरीक्षार्थीचा निकाल ४०.८३ टक्के
राज्याच्या ९ विभागीय मंडळातून ७३ हजार ५९७ पुर्नपरीक्षार्थी बसले होते त्यापैकी २९ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी ४०. ८३ इतकी आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९३.०१ टक्के लागला आहे. एकूण १६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण निकालात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६.४० टक्क्यांनी अधिक आहे.
निकाल पुढील संकेतस्थळांवर पाहता येतील
मोबाइलवर निकाल
बीएसएनएल-धारकांनी MHHSC
तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा मोबाइलधारकांनी MAH12
विभागीय मंडळ निहाय बारावीचा निकाल
पुणे - ९१.१६ टक्के
नागपूर - ८९.०५ टक्के
औरंगाबाद - ८९.८३ टक्के
मुंबई - ८८.२१ टक्के
कोल्हापूर - ९१.४० टक्के
अमरावती - ८९.१२ टक्के
नाशिक - ८८.२२ टक्के
लातूर - ८८.२२ टक्के
कोकण - ९५.२० टक्के
बारावी परीक्षेचा शाखानिहाय निकाल
१. विज्ञान शाखा - ९५.८५ टक्के
२. कला शाखा - ८१.९१ टाक्के
३. वाणिज्य शाखा - ९०.५७ टक्के
४. व्यवसाय अभ्यासक्रम - ८६.२७ टक्के