बारावीचा निकाल महिनाअखेर

By admin | Published: May 8, 2016 02:11 AM2016-05-08T02:11:48+5:302016-05-08T02:11:48+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मेच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या

HSC results at month end | बारावीचा निकाल महिनाअखेर

बारावीचा निकाल महिनाअखेर

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मेच्या अखेरीस तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याच्या दिशेने मंडळातर्फे सकारात्मक पाऊल टाकले जात आहेत. मात्र,त्यापूर्वीही निकाल जाहीर केला जाऊ शकतो, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाने यांनी शनिवारी सांगितले.
मागील वर्षी बारावीचा निकाल २७ मे रोजी तर दहावी निकाल ८जून रोजी जाहीर करण्यात आला होता. काही दिवसात निकालाच्या अधिकृत तारखा मंडळातर्फे जाहीर केल्या जाणार आहेत,असेही म्हमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: HSC results at month end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.