पेपर तपासणीवरील बहिष्कारामुळे बारावीचा निकाल लांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 05:39 AM2019-02-25T05:39:20+5:302019-02-25T05:39:29+5:30

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार कायम असल्याने बारावीच्या सुमारे ३० लाख उत्तरपत्रिका पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

HSC results will be delayed due to boycott? | पेपर तपासणीवरील बहिष्कारामुळे बारावीचा निकाल लांबणार?

पेपर तपासणीवरील बहिष्कारामुळे बारावीचा निकाल लांबणार?

Next

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार कायम असल्याने बारावीच्या सुमारे ३० लाख उत्तरपत्रिका पडून असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमुळे शिक्षकांनी परीक्षेवरील बहिष्कार मागे घेतला होता. मात्र अर्थ विभागाकडे असलेल्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार असल्याची भूमिका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतल्याने बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


याबाबत महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले की, शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या मागण्या मान्य केल्या असल्या, तरी अर्थमंत्र्यांनी २६ फेब्रुवारीला बैठक बोलावल्याने आंदोलन लांबले आहे. दररोज सुमारे १५ लाख उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडून राहणार आहेत. शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर विद्यार्थी हितासाठी केवळ परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला होता.

मात्र उरलेल्या मागण्यांवर अर्थमंत्री जोपर्यंत निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणार नसल्याचेही महासंघाने स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५ जूनआधी बारावीचा निकाल लागणे बंधनकारक आहे. मात्र निकालाची डेडलाइन हुकल्यास त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.

Web Title: HSC results will be delayed due to boycott?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा