बारावीच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमुळे भुर्दंड
By admin | Published: June 26, 2017 02:00 AM2017-06-26T02:00:51+5:302017-06-26T02:01:29+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुदत उलटून गेल्याने प्रतिदिन ५० रुपये दंडासह अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र, तीन दिवस सुट्या असल्याने या दिवसांचे शुल्कही विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहे.
बारावीची लेखी पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत १९ जूनपर्यंत होती. त्यामुळे २० ते ३० जून या कालावधीत विद्यार्थ्यांकडून नियमित शुल्कासह अतिविलंब शुल्क म्हणून प्रतिदिन ५० रुपये दंड आकारून अर्ज घेतले जात आहेत. या कालावधीत २४ ते २६ जून अशी सलग तीन दिवस सुटी आली आहे.
त्यामुळे यादिवशी मंडळाकडे अर्ज सादर करता येत नाही. मंडळाकडूनही तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही.