भुसावळमध्ये पालकमंत्र्यांसोबत हुज्जत

By Admin | Published: May 13, 2014 12:36 AM2014-05-13T00:36:31+5:302014-05-13T00:36:31+5:30

मद्यधुंद व्यक्तींनी पालकमंत्र्यांना शिवीगाळ केल्याने त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि हे समजताच नातेवाईक आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

Hugajate with the Guardian in Bhusawal | भुसावळमध्ये पालकमंत्र्यांसोबत हुज्जत

भुसावळमध्ये पालकमंत्र्यांसोबत हुज्जत

googlenewsNext

 भुसावळ (जि. जळगाव) : निमित्त झाले ते मद्यधुंद व्यक्तींनी पालकमंत्र्यांना शिवीगाळ करण्याचे. त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि हे समजताच नातेवाईक आणि समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. इकडे पालकमंत्री कारवाईवर ठाम. प्रशासन आज दिवसभर दोघांच्याही वेठीस. अखेर दोघांमध्ये समेट झाला आणि कोणावरही गुन्हा दाखल न करता प्रश्न निकाली लागला. आपल्या नातेवाईकांना पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे हे पाहून जमावाने पालकमंत्री संजय सावकारे यांच्या विरोधात घोषणा देत पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले. याबाबत सावकारे म्हणाले,की पंचशील नगरात लग्नासाठी गेल्यानंतर आपल्या अंगरक्षकांसह नगरसेवकांस संबंधित दोघांनी दारू प्राशन करुन शिवीगाळ केल्याने त्यांना अंगरक्षकांनीच बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणले़ झाले असे, पंचशील नगरातील रहिवासी अजय रमेश काकडे यांच्याकडील लग्नसमारंभासाठी तसेच या भागातील तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने सांत्वनासाठी पालकमंत्री गेले होते़ या वेळी राजू रामा सुरडकर (३८) व समाधान दगडू साळुंखे (३९, दोन्ही रा़पंचशील नगर) यांनी मद्यधूंद अवस्थेत सावकारे यांच्याशी हुज्जत घातली़ मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना ताब्यात घेत दुपारी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले तर पालकमंत्र्यांनी पोलीस निरीक्षक सतीश देशमुख यांच्याकडे तोंडी तक्रार केली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याने दोघांना ताब्यात घेतले आणि यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले़ संतप्त जमावाचा ठिय्या या प्रकाराची माहिती दोघांच्या कुटुंबियांना तसेच अनुप खोब्रागडे व कार्यकर्त्यांना कळाली. त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले. या जमावाने बाजारपेठ पोलीस ठाण्याबाहेर सावकारेंविरोधात घोषणाबाजी केली तसेच त्यांच्या अटकेची मागणी केली. पोलीस निरीक्षकांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला रस्त्यावरून उठवल्याने वाहतूक सुरळीत झाली़ याचवेळी एक महिला बेशुद्ध पडल्याने तिला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले़ संतप्त जमावाच्या भावना लक्षात घेता वादावर पडदा पडण्यासाठी पोलीस निरीक्षकांच्या दालनात बैठक झाली़ झाल्या प्रकारावर तासभर खल झाल्यानंतर कुणाविरुद्धही तक्रार दाखल न करण्याचे ठरले व वादावर पडदा पडला़ पोलीस निरीक्षक सतीश देशमुख यांनी सांगितले, की ताब्यात घेतलेल्या दोघांनी मद्यप्राशन केल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अ‍ॅक्ट ११०, ११७ अन्वये त्यांच्यावर कारवाई करून ताकीद देऊन सोडण्यात आले़ चौकट पालकमंत्र्यांविरुद्ध अर्ज पालकमंत्री संजय सावकारे यांच्या अंगरक्षकांनी मारहाण केल्याची तक्रार राजू सुरडकर यांनी बाजारपेठ पोलिसांकडे केली आहे़ पालकमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याने त्यांच्याविरोधात तसेच अंगरक्षकांवरदेखील गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली़ ----------

Web Title: Hugajate with the Guardian in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.