स्वातंत्र्यदिनी साकारणार २३५ फुटाचा विशाल केक
By admin | Published: August 11, 2016 09:38 PM2016-08-11T21:38:27+5:302016-08-11T21:46:25+5:30
‘नॅशनल इंट्रेग्रिटी मिशन’, ‘वंदेमातरम संघ’ आणि ‘हुशे’ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवार, १५ आॅगस्ट रोजी शहरात २३५ फुटाचा विशाल केक साकारण्यात येणार आहे.
अकोला: ‘नॅशनल इंट्रेग्रिटी मिशन’, ‘वंदेमातरम संघ’ आणि ‘हुशे’ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवार, १५ आॅगस्ट रोजी शहरात २३५ फुटाचा विशाल केक साकारण्यात येणार आहे.
मनामनात राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी ‘नॅशनल इंट्रेग्रिटी मिशन’च्यावतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर असे विश्वविक्रमी उपक्रम राबविले जातात. यंदा ७0 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करताना तेवढ्याच आकाराचा, म्हणजे २३४ फुटाचा व ३00 किलोपेक्षा अधिक वजनाचा हा तिरंगी केक अकोलेकरांसाठी संपूर्ण वैदर्भियाकरीता आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरा हा विशाल केक प्रदर्शनासाठी ठेवला जाणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे.